शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

जिल्ह्यात जानकर अन् भाजप दूरच..-बातमी मागची बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:30 AM

म्हसवड : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आपल्या स्वत:च्या नोंदणीकृत पक्षाचे अध्यक्ष असताना मात्र सभागृहात ते भाजपचे सदस्य आहेत.

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सवतासुभा : माण तालुक्यातील कार्यकर्ते एकमेकांपासून लांबच-

सचिन मंगरुळे ।म्हसवड : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आपल्या स्वत:च्या नोंदणीकृत पक्षाचे अध्यक्ष असताना मात्र सभागृहात ते भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे आहेत? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित करून माण तालुक्याचे सुपुत्र दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री जानकर भाजप की रासपचे? हा प्रश्न ऐरणीवर आणला असला तरी माण तालुक्यातील स्थानिक भाजपा आणि रासपचे कार्यकर्ते व नेते अजून तरी एकत्रित आल्याचे चित्र दिसून येत नाही.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत माणची जागा वाटपात रासपकडे गेली. रासपचे शेखर गोरे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत पक्षाला दोन नंबरची मते मिळाली. या निवडणुकीचा अपवाद वगळता रासप व भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवल्या नसल्याची वस्तुस्थिती आहे.

रासपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत खटाव तालुक्यात स्वतंत्र पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर माणमध्ये आंधळी गटात पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार उभा केला होता तर मार्डी गटात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून निवडणूक लढवली होती.

यामध्ये रासपच्या वाट्याला वरकुटे-म्हसवड पंचायत समिती गण आला होता. याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बबनदादा विरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे व भाजपाचे नेते व कार्यकर्तेे एकत्रितपणे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात आल्याचे दिसून आले नाहीत. 

आजवर सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा वापर करून घेतला. आजवर राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेली ही शेवटचीच चूक यापूढच्या कोणत्याही निवडणुका असू द्या, आमचा राष्ट्रीय समाज पक्ष व भारतीय जनता पक्ष युती करूनच निवडणुकीस सामोरे जाणार आहोत.-मामूशेठ वीरकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्षमुळातच महादेव जानकर यांनी भाजपासोबत जायला नको होते. त्यांनी रासपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, ते सध्या अध्यक्ष नाहीत तर सध्या या पक्षाचे अध्यक्ष अक्किसागर आहेत. मुळातच भाजपाचे षडयंत्र प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे, त्याचेच बळी महादेव जानकर ठरले आहेत.- मारुती जानकर, राज्याध्यक्ष, मल्हार क्रांती संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahadev Jankarमहादेव जानकर