शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

साताऱ्यातही ‘कोल्हापूर पॅटर्न’; एकरकमी देणार एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:05 PM

सातारा : एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. त्यानंतर ...

सातारा : एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकाºयांच्या मध्यस्थीने साखर कारखानदार व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. यावेळी एकरकमी एफआरपीची पहिली उचल देण्याच्या ‘कोल्हापूर पॅटर्न’वर तोडगा निघाल्याने जिल्ह्यात आंदोलन स्थगित करण्यात आले.जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी करून आंदोलनचे रणशिंग फुंकले होते. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ऊसदराची कोंडी झाली होती. शनिवारी कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत कारखानदार व शेतकरी संघटनेच्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याची तयारी दर्शविल्याने कोंडी फुटली.या पार्श्वभूमीवर साताºयात जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील बारावकर, उपअधीक्षक समीर शेख, स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सचिनकुमार नलावडे, बळिराजाचे संस्थापक पंजाबराव पाटील, रयत क्रांतीचे संजय भगत, प्रकाश साबळे, शरद जोशी प्रणीत संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, भूमाता ब्रिगेडचे धर्मराज जगदाळे यांच्यासह जिह्यातील शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते व कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला संघटनेच्या पदाधिकाºयांनी मागील थकबाकी आणि एफआरपीच्या मुद्द्यावरून कारखान्यांच्या प्रतिनिधींना कोंडीत पकडले. तब्बल दोन तास चाललेल्या चर्चेनंतर कारखानदारांनी सांगली, कोल्हापूरच्या कारखानदारांप्रमाणे एफआरपी देण्याचे मान्य केले. तसेच मागील वर्षीची दोनशे रुपयांची उर्वरित रक्कम उपलब्धतेनुसार द्यायचे आणि साखरेचे भाव वाढल्यास या गळीत हंगामातील दोनशे रुपये देण्याचे कबूल केले. यास शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी सकारात्मकता दाखवली.दरम्यान, कारखानदार व शेतकरी संघटना यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कारखान्यांनी एका महिन्यात ते पैसे दिले नाहीत तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला. त्यानंतर स्वाभिमानीचे प्रवक्ते अनिल पवार यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.कारखान्यांनी जाहीर केलेले दरकारखाना एफआरपीजयवंत २९५६कृष्णा २९४६अजिंक्यतारा २८२०किसन वीर २७००गोपूज २६१८सह्याद्री २८५०कारखाना एफआरपीबाळासाहेबदेसाई २७२२शरयू २४१५स्वराज २२१५जरंडेश्वर २६९८रयत २६१७