शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

कोल्हापूरच्या मराठा क्रांती मोर्चातही लाखभर सातारकर !

By admin | Published: October 15, 2016 11:41 PM

जिकडं पहावं तिकडं एमएच ११ : मोर्चात सहभागी होऊन दाखवून दिली एकीची ताकद

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चा निघत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चात लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होत आहेत. कोल्हापूरमध्ये निघालेल्या मोर्चात खरी ताकद दाखविण्यासाठी सातारा जिल्हा धावून गेला आहे. सुमारे लाखभर सातारकर या मोर्चात सहभागी झाले आहेत. साताऱ्याच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यातून समाजबांधव आले होते. सातारकरांनी हीच जाणीव ठेवून कोल्हापूरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी यापूर्वीपासूनच मोर्चेबांधणी केली होती. अनेकांनी वाहने ठरवून ठेवली होती. कोणत्या वाहनांमधून कोणी-कोणी जायचे. ऐनवेळी वाहने कमी पडली तर पर्यायी वाहनांची सोय करण्यात आली होती. ऐनवेळी पेट्रोल, डिझेलअभावी खोळंबा होऊ नये म्हणून वाहनांच्या टाक्या भरून ठेवल्या होत्या. कोल्हापूरमध्ये एकदा गर्दी होऊ लागली की, शहरात घुसणे अवघड होणार आहे. रस्ते बंद झाल्यास अडचण येऊ नये, यासाठी तसेच सातारा महामोर्चाचा अनुभव असल्याने जिल्ह्यातील तरुणाई तयारीला लागली होती. सातारा जिल्ह्यातून भगवे फेटे, भगव्या पताका घेऊन हजारोंच्या संख्येने तरुणाई कोल्हापूरच्या दिशेने शुक्रवारी रात्रीच रवाना झाली. (प्रतिनिधी) बावडामध्ये वाहनतळ साताऱ्याच्या बाजूने आलेल्या वाहनांसाठी बावड्यात वाहनतळ तयार केले होते. त्याठिकाणी वाहने लावून मोर्चा सुरू झाला त्या ठिकाणापर्यंत चालत जावे लागत होते. हे अंतर सरासरी सहा किलोमीटरच्या घरात होते. तरीही सातारकर न थकता जात होते.