ओगलेवाडी : ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील सातारा जिल्हा बँकेच्या शाखेसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि मानव कल्याणकारी संघटना याच्या संयुक्त विद्यमाने कोविड मदत केंद्र सुरू करण्यात आले. हे मदत केंद्र मानव कल्याणकारी संघटना जिल्हाध्यक्ष नितीन आवळे, तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. लाॅकडाऊनचा परिणाम हा गरिबांना सहन करावा लागतो आहे. अनेकांना घर कसे चालवावे, हाच प्रश्न सतावत राहिला आहे. गरिबांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाच्या काळात त्यांना विविध प्रकारची मदत मिळावी, या हेतूने हे केंद्र सुरू केले आहे. मंगळवारी या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मानव कल्याणकारी संघटना राज्याध्यक्ष सलीम पटेल, आरपीआय युथ जिल्हाध्यक्ष जयवंतराव वीरकायदे, सोमनाथ सूर्यवंशी, संजय लिमकर, सर्जेराव बनसोडे, अनिकेत खरात, प्रसाद सातपुते, शैलेश माने, सिद्धांत गोतपागर, रविराज पळशे, प्रमोद सातपुते, आसिफ पटेल, इम्रान संदे व कार्यकर्ते उपस्थित होते.