सातारा : शहरात गत काही महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी पोलिसांनी बर्थडे बॉयसह सहा आणि अन्य एका प्रकरणात दोन अशा एकूण आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार कोयते आणि एक तलवार जप्त करण्यात आली आहे.आदिल अस्लम शेख (वय २६), शादाब अय्याज पालकर (वय २०), मिजान निसार चौधरी (वय ३०), तोसिफ अजिज कलाल (वय २६), शांदाब अस्लम शेख (वय २५), समीर अस्लम शेख (सर्व रा. दस्तगीर कॉलनी, शनिवार पेठ, सातारा), अभिजित राजू भिसे (वय १८, रा. सैदापूर, ता. सातारा), अमीर सलीम शेख (वय १९, रा. वनवासवाडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरामध्ये दहा जूनला दस्तगिर कॉलनीत राहणाऱ्या आदिल शेख याचा वाढदिवस होता. त्यावेळी त्याच्या वाढदिवसाचा केक कोयत्याने कापला होता. याचा फोटो पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी आदिल शेखला ताब्यात घेतले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासला असता मोबाइलमध्ये आणखी काही वेगवेगळ्या कोयत्यांचे फोटो असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी फोटोमध्ये दिसणाऱ्या एका-एकाला घरातून अटक केली. त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच घरात लपवून ठेवलेले चार कोयते आणि एक तलवार पोलिसांच्या स्वाधिन केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोयते सापडल्याने शहरात खळबळ उडाली.
जप्त केलेले कोयते हॉकीस्टीक पेक्षा मोठे आहेत. या युवकांवर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. मात्र, भविष्यात या टोळीकडून नक्कीच अनुचित प्रकार घडला असता, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे आदींनी केली.दरम्यान, शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अन्य एका दुसºया घटनेतील दोघांना अटक केली. त्यामध्ये अभिजित भिसे आणि अमीर शेख या दोघांचा समावेश आहे. दि. १२ रोजीर् या दोघांनी विसावा नाका येथे ओमणी कारची कोयत्याने तोडफोड केली होती.
चालक शिवाजी संदीपान सरगर (रा. शिक्षण कॉलनी, जुना आरटीओसमोर, सातारा) यांच्या खिशातील २७०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावली होती. तसेच उमेश गायकवाड याच्यावरही कोयत्याने वार करून त्याच्याकडील चेन आणि पाकिट चोरून नेले होते. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या टीमने केली.कोयते तयार करणाऱ्याचा तपास सुरूकोयता बाळगणाऱ्या युवकांचा खाटिकाचा व्यवसाय आहे. मात्र, व्यवसायाला एवढे मोठे कोयते लागत नाहीत. हे मोठे कोयते जाणूनबुजून त्यांनी तयार करून घेतले आहेत. ज्यांनी हे कोयते तयार केले, त्यांच्याकडे आता पोलिसांनी आपला मोर्चा वळविला असून, संबंधितांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.