ठळक मुद्देकोयना धरण ३० टक्के भरलेसाताऱ्यात सूर्यदर्शन : पश्चिम भागात पाऊस सुरूच
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, कोयना धरण ३० टक्के भरले आहे. तर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे आणि सोमवारी दिवसभरात एकूण ३४५.५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. साताऱ्यात अनेक दिवसानंतर सकाळी सूर्यदर्शन घडले.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस कोसळत आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा तालुक्यांत पाऊस चांगलाच झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागलाय. कोयना धरणात मंगळवारी सकाळपर्यंत ३१.१४ टीएमसी पाणीसाठा झाला होता, त्यामुळे धरण जवळपास ३० टक्के भरले आहे.
धरणाची पाणीपातळी २०७८.८ फूट असून, परिसरात ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर नवजाला ८३ व आतापर्यंत १७२९, महाबळेश्वरला २४ तासांत १२० तर आजपर्यंत १६४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.