संजय पाटीलकऱ्हाड : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची उभारणी १९६१ मध्ये झाली. गत साठ वर्षांहून अधिक काळापासून हे धरण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशची तहान भागवत आहे. त्यातच उभारणीपासून आजअखेर तब्बल ५२ वेळा हे धरण काठोकाठ भरले आहे. तर नऊवेळा साठवण क्षमतेपेक्षा पाणीसाठा कमी राहिला.कोयना धरणाला ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या बासष्ठावे वर्ष सुरू आहे. उभारणीपासून या धरणाने तब्बल ६१ पावसाळे पाहिले आहेत. त्यापैकी बावन्न पावसाळ्यांमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले. तर नऊवेळा साठवण क्षमतेपेक्षा धरणातील पाणीसाठा कमी राहिला. मात्र, तरीही उपलब्ध पाण्यात सिंचनासह विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात व्यवस्थापन यशस्वी ठरले. आजवर या धरणाने राज्य प्रकाशमान करण्याबरोबरच आसपासच्या राज्यांची तहान भागविली आहे. अतिवृष्टीच्या काळात तुडुंब जलाशय आपल्यात सामावून घेतला आहे. तसेच भूकंपाचे लाखो धक्के सहन करीत धरण भक्कमपणे उभे आहे.दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल का, याची चिंता लागून राहते. धरण भरले नाही तर सिंचनासह वीज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धरण भरावे, यासाठी व्यवस्थापनाला अचूक नियोजन करावे लागते. पावसाचा अंदाज घेत विसर्ग आणि साठा यावर नियंत्रण ठेवावे लागते. सध्या पावसाची संततधार असून येत्या काही दिवसात धरण काठोकाठ भरण्याची चिन्हे आहेत.
...यावर्षी पाणीसाठा कमी१९६८ : ९४.०२०१९७२ : ८९.५९७१९८७ : ९१.२३६१९८९ : ९८.९८३१९९५ : ९५.७८९२००० : ९२.३४६२००१ : ९१.१२४२००३ : ९३.२७१२०१५ : ९४.३५०
पाणीसाठ्याचे नियोजन६७.५० टीएमसी : वीज निर्मितीला५.२५ टीएमसी : मृत पाणीसाठा३२.५ टीएमसी : सिंचनासाठी
धरणाचा लेखाजोखातांत्रिक वर्ष : १ जून ते ३१ मेसाठवण क्षमता : १०५.२५ टीएमसीसद्यस्थितीत साठा : ७४.२२ टीएमसीओलिताखाली क्षेत्र : १२.२३ हजार हेक्टर
... अशी झाली उभारणीप्रशासकीय मान्यता : सन १९५४कामाला सुरुवात : १९ जानेवारी १९५४पाणी अडविण्यास सुरुवात : सन १९६१धरणाचे उद्घाटन : १६ मे १९६२धरणाचे काम पूर्ण : सन १९६३प्रारंभीची क्षमता ९८.७८ टीएमसीकोयना धरणाची उभारणी झाल्यानंतर सुरुवातीची साठवण क्षमता ९८.७८ टीएमसी होती. २००३ सालापासून साठवण क्षमतेत वाढ होऊन ती १०५.२५ टीएमसी झाली.