शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

पावसाची उघडीप; कोयना धरण भरण्यास लागणार उशिर

By नितीन काळेल | Published: August 07, 2023 1:01 PM

महाबळेश्वरला १० मिलीमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असल्याने धरणातील पाणीसाठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कोयना धरण भरण्यास यंदा उशिर लागू शकतो. सध्या धरणात ८२ टीएमसीवर पाणीसाठा आहे. तर २४ तासांत महाबळेश्वरला फक्त १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरूवात झाली. पश्चिम भागात सवा महिना पाऊस पडत होता. त्यातील १५ दिवस संततधार होती. त्यामुळे कास, तापोळा, बामणोली, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरातील जनजीवनावर परिणाम झालेला. तसेच पश्चिमेकडीलच धोम, कोयना, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे आज ही धरणे ७० टक्क्यांवर पोहोचलीत.पण, गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत गेला. तर सध्या पावसाची उघडीप आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला अवघा १२ तर नवजाला १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वरलाही १० मिलीमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस हा नवजाला ४४२० मिलीमीटर पडला. तर कोयनानगर येथे ३११२ आणि महाबळेश्वरला ४०७७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

पावसाची उघडीप असल्याने धरणातही कमी प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. कोयनाक्षेत्रातही तुरळक पाऊस होत असून सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ९ हजार ८६० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणपाणीसाठा ८२.१६ टीएमसी झाला होता. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पश्चिम भागात पावसाची उघडीप असल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही उतार आलेला आहे.

कोयनेत गतवर्षी ६७ टीएमसी पाणीसाठा...जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले आहे. गेल्यावर्षी ७ आॅगस्टपर्यंत कोयना येथे अवघा २४४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर नवजाला ३१८९ आणि महाबळेश्वरला ३२१३ मिलीमीटर पाऊस पडलेला. तर कोयना धरणात ६७.५७ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा कोयना धरणात अधिक पाणीसाठा आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस