सातारा : साताºयासह जिल्ह्याच्या सर्वच भागात सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत १००.७८ टीएमसी पाणीसाठा झाला.
जिल्ह्यात निसर्गाने समतोल राखला आहे. पश्चिम भागातील महाबळेश्वर, वाई, जावळी, सातारा, पाटण तालुक्यांमध्ये जून ते आॅगस्ट या कालावधीत पाऊस पडतो. तर दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात सप्टेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात पाऊस पडतो. परंतु, यंदा पश्चिम भागातही सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.
साताºयात सोमवारी रात्री अकरा वाजल्यानंतर रात्रभर संततधार पाऊस पडत असून मंगळवारी दुपारी बारा वाजले तरी पावसाची संततधार सुरूच आहे. सातारा, महाबळेश्वर, कºहाड तालुक्यातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
कोयना धरणामध्ये येणाºया पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणात मंगळवारी सकाळपर्यंत १००.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाने गेल्या महिन्यातही शंभर टीएमसीचा पल्ला ओलांडला होता. दरम्यानच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने पाणी कमी झाले होते. त्यात पुन्हा वाढ झाली आहे.