तरडगाव : तरडगाव (ता. फलटण) येथील प्रगतशील शेतकरी जनार्धन संतराम अडसूळ यांना राज्य शासनाचा २०१८ चा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
तरडगाव येथील जनार्धन अडसूळ हे गेली अनेक वर्षे शेतीत नवनवीन प्रयोग राबवत आहेत. शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच आधुनिक शेतीचे मार्गदर्शनदेखील ते करतात. शेतकऱ्यांना माल स्वतः विकता यावा यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या योजनेचा त्यांनी इतरांना लाभ मिळवून दिला आहे. त्यांना शासनाचा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे तरडगाव ज्वारी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रीतम कोरडे, सचिव दीपक खताळ, सुरेश शिंदे, अशोक शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम ढाणे, प्रकल्प अधिकारी राहुल गायकवाड आदींनी त्यांचे कौतुक केले.
फोटो : जनार्धन अडसूळ