शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

‘कृष्णे’चा आज फैसला

By admin | Published: June 22, 2015 10:14 PM

धाकधूक वाढली : तिन्ही पॅनेलचे समर्थक करताहेत विजयाचा दावा

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले. मंगळवार, दि. २३ रोजी येथील शासकीय गोदाममध्ये त्याची मतमोजणी होणार असून, तिन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. त्याचबरोबर उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ‘कृष्णे’चा फैसला निश्चित होईल.कारखान्याच्या इतिहासात यंदा प्रथमच तिरंगी सामना पाहायला मिळाला. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल, डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते यांचे रयत पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांचे सहकार पॅनेल असा सामना पाहायला मिळाला. सातारा, सांगली जिल्ह्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांत कारखान्याचे सुमारे ४६ हजार सभासद विखुरल्याने गत महिनाभरात तिन्ही पॅनेलचे नेते व उमेदवारांनी पायात भिंगरी बांधून प्रचार केला.नेत्यांच्या जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, प्रचार गीते, ‘एलईडी’च्या हायटेक प्रचाराने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. टोप्या, झेंडे, कापडी व प्लेक्स बोर्डमुळे कार्यक्षेत्रात एक वेगळाच माहोल तयार झाला होता.शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, चौकाचौकांत लावलेले बोर्ड हटविण्यात आल्याने चौकांनी मोकळा श्वास घेतला. निवडणूक यंत्रणेने वेग घेतला. मतदान केंद्रांवर मतदान झाले. ४६ हजार २९७ मतदारांपैकी ३७ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.दरम्यान, तिन्ही पॅनेलच्या समर्थकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. प्रथमच तिरंगी लढत झाल्याने अंदाज बांधणे कठीण झाले आहे. समर्थक कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. ठिकठिकाणी निकाल काय लागणार याचीच चर्चा रंगली आहे. सभासदांव्यतिरिक्त इतर लोकांचीही निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (प्रतिनिधी)अनेकांनी लावल्यात पैजानिवडणुकीच्या निकालाबाबत अनेक तर्कविकर्त लढविल्या जात आहेत. कार्यकर्ते आपापल्या बुद्धीने मतांचा हिशोब मांडत आहेत. आम्हीच कसे जिंकणार, हे सांगत आहेत. त्यातूनच गावागावांत आणि कार्यकर्त्यांच्यात पैजा लागल्याचे चित्र आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ४३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी ९० टेबल ठेवण्यात आले असून, एका टेबलवर १ पर्यवेक्षक, ३ सहायक कर्मचारी, १ शिपाई असे पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना सोमवारी दुपारी प्रशिक्षणही देण्यात आले आहे.- राजेंद्र शेळके, सहायक निवडणूक अधिकारी