स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा निकाल : यशवंत विधि महाविद्यालय, यशवंत हौसिंग सोसायटीचीही बाजी
मलकापूर
स्वच्छ सर्वेक्षण- २०२१ साठी मलकापुरात पालिकेने विविध गटांत स्वच्छ संस्था स्पर्धा घेतल्या. यामध्ये स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धेत कृष्णा हॉस्पिटलने प्रथम क्रमांक मिळविला. तर स्वच्छ हॉटेलमध्ये हॉटेल संगम, स्वच्छ विद्यालयात यशवंत विधि महाविद्यालय, स्वच्छ सोसायटीत यशवंत हौसिंग सोसायटी, स्वच्छ शासकीय कार्यालयांत सार्वजनिक बांधकाम विभाग मलकापूर, स्वच्छ खासगी कार्यालयात दि कराड अर्बन को. ऑप बँक मलकापूर यांनी प्रथम क्रमांकावर बाजी मारली. त्यांना स्वच्छ इमारती म्हणून प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
मलकापूर येथे नुकतेच एका कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या नेत्या सत्वशीला चव्हाण, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जि. प. सदस्या मंगला गलांडे, गौरी चव्हाण, विद्याताई थोरवडे, कल्पना गायकवाड, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नगरसेवक सागर जाधव, नगरसेविका भारती पाटील, कमल कुराडे, स्वाती तुपे, माधुरी पवार, निर्मला काशिद, नंदा भोसले, अलका जगदाळे, गीतांजली पाटील, नूरजहाँन मुल्ला, आनंदी शिंदे, पूजा चव्हाण आदी उपस्थित होत्या.
चौकट
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत विविध स्पर्धांचे निकाल अनुक्रमे
१) ऑडिओ क्लिप/जिंगल - क्षितिज गावडे , अभिनव फिल्म व स्वरसंध्या ग्रुप , शीतल रैनाक .
२) लघुपट स्पर्धा- अभिनव फिल्म , क्षितिज गावडे व ग्रुप , मंगल निगडे
३) टाकाऊपासून टिकाऊ प्रतिकृती स्पर्धा- भारती जाधव , शीतल हांडे , निशा बोरगे व मीना कोळेकर ४) निबंध स्पर्धा- वैष्णवी कांबळे , जिज्ञासा कसबे , रविराज देशमुख
५) चित्रकला स्पर्धा- सिध्दी साठे , रविराज देशमुख , तन्वी पवार , परिमिता रणदिवे
चौकट
सक्रिय सहभागाबद्दल सन्मान
स्वच्छता अभियानात सक्रिय सहभागी होऊन स्वच्छतेसाठी योगदान दिलेल्या संस्था व व्यक्ती यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात सातारा जिल्हा परिषद सेवकांची मालकी सहकारी गृहनिर्माण संस्था आगाशिवनगर, आधार सामाजिक संस्था, रोटरी क्लब ऑफ मलकापूर, लायन्स क्लब ऑफ मलकापूर, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट,नूतन मराठी प्राथमिक शाळा आगाशिवनगर, दिनदयाळ अंत्योदय योजना नगरपालिका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत स्थापित महिला बचत गट, कोयना औद्योगिक वसाहत यांचा गौरव करण्यात आला. तर सकारात्मक बदल अभिप्रायसाठी सुरेश बागल, सुनिता भुंजे, सुनील कुंभार यांना गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.
फोटो :