शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

कृष्णा प्रकल्प फेरजलनियोजनास राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त

By नितीन काळेल | Published: October 01, 2023 9:14 PM

दुष्काळी भागाला लाभ : दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील दुष्काळप्रवण तसेच पाण्यापासून वंचित भागासाठी दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी अशी प्रमुख मोठी धरणे आहेत. या धरणातील पाण्यावर साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील शेती सिंचन होते. जिल्ह्यातील पूर्व भाग दुष्काळी आहे. तरीही माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात विविध योजनांतून पाणी पोहोचलेले आहे. त्यामुळे काही प्रमाणात सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तरीही माण आणि खटाव तालुक्यातील काही भागात सिंचनापासून वंचित होता. या भागाच्या पाण्यासाठी आंदोलने झाली. तसेच लोकप्रतिनिधींनीही यासाठी शासनदरबारी आजाव उठवत आक्रमक मागणी लावून धरली. त्यामुळे हळूहळू का असेना वंचित भागांनाही पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ लागला आहे. त्यातच राज्य शासनाने आता सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता दिली असल्याने आणखी काही भागाला पाणी उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या फेर जलनियोजनास मान्यता दिलेली आहे. त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुष्काळप्रवण भागातील काही भाग पाण्यापासून वंचित होता. या भागासाठी आता दोन टीएमसी पाणी अतिरिक्त उपलब्ध होणार आहे. यामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शासन अध्यादेशाने आणि जलसंपदा विभागाने काढलेल्या आदेशानुसार कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित फेर नियोजनासाठीची संपूर्ण जबाबदारी ही कार्यकारी संचालक आणि मुख्य अभियंत्यांकडे राहणार आहे. तसेच यामुळे कृष्णा खोरे पाणी तंटा लवादामधील तरतुदीचा भंगही होणार नाही हेही पहावे लागणार आहे.चार तालुके; ९ हजार हेक्टरला लाभ...

फेर जलनियोजनानुसार दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्याबरोबरच साताऱ्यालाही होणार आहे. यामधून ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शासनाच्या या निर्णयाने लाभधारक शेतकऱ्यांना कायमस्वरुपी पाणी मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मंजूर सुधारित पाणीवापर...

जिल्ह्यातील सिंचनासाठी धोम, कण्हेर, वसना आणि वंगणा योजनानिहाय पाणी वापर निश्चित करण्यात आला आहे. २००१ मधील ऑक्टोबरमध्ये लवादास सादर केलेल्या नियोजनानुसार २६.८६८ अब्ज घन फूट पाण्याचे नियोजन होते. तर ७ जानेवारी २०२२ नुसार पाणीवापर २८.११८ अब्ज घन फूट आहे. तर आता मंजूर सुधारित पाणीवापर वाढवून ३०.१३ अब्ज घनफूट करण्यात आला आहे.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसर