शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

कृष्णा नदीतील साड्या गरजू महिलांना दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:26 PM

कºहाड : कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली.

ठळक मुद्देकन्यागत महोत्सव समितीचा उपक्रमकन्यागत पर्व काळात तेरा महिने रोज नदीची आरती बारा वर्षातून एकदा आलेल्या कन्यागत पर्व काळातआजपर्यंत तेरा महिने दररोज न चुकता सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नदीचे पूजन करून आरती

कºहाड : कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतून बाहेर काढलेली साडी ही सैदापूर, प्रीतिसंगम घाट परिसरातील गरीब व स्वच्छता करणाºया गरजू महिलांना दान करण्यात आली.कन्यागत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. विनायक गरुड, सचिव विश्वनाथ जोशी, सुधीर कुलकर्णी, पराग देशमुखे, मनोहर इनामदार, अग्निशामक दलाचे अनिल डुबल, उत्तम डेस्के, आनंद माने आदी अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष नदीतील साडी काढण्यास प्रारंभ करण्यात आला. कन्यागत पर्व समितीतील पदाधिकाºयांसह कर्मचाºयांनी बोटीच्या सा'ाने कृष्णानदी पात्रातून पलीकडे जात तेथील साडी घेऊन परत आले. सुमारे दोन तास इतका वेळ साडी काढण्यासाठी लागला. सकाळी साडेअकरा वाजता सुरू करण्यात आलेले काम हे दुपारी दीड ते दोन वाजता संपविण्यात आले. साडी काढल्यानंतर ती यावेळी उपस्थित सहा ते सात महिलांनी वेगवेगळी केली. तसेच त्या साड्या उन्हामध्ये सुकविण्यात आल्या. त्यानंतर त्यांची एकत्रित घडी घालण्यात आली. यावेळी या कामास वेदांत करिअर अ‍ॅकॅडमीचे सोळा विद्यार्थी तसेच परिसरातील महिलांनीही सहकार्य केले.

एकूण १२५ साड्या एकत्रित करून तयार करण्यात आलेली साडी नेसविल्यात आल्याने ती विभक्त करण्यासाठी महिला तसेचसदस्यांना दोन ते तीन इतका तास वेळ लागला. विभक्त केलेल्या साड्यांपैकी २५ साड्या या सैदापूर येथील ग्रामस्थांना देण्यात आल्या.तसेच प्रीतिसंगम घाट परिसरातील पालिकेच्या व इतर सफाई करणाºया महिलांना २५ साड्यांचे वाटप करण्यात आले. यातून इतर बाकी राहिलेल्या साड्यांचे वाटपही करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

धार्मिक विधीबरोबर नदी स्वच्छतेकडेही लक्ष१२ आॅगस्ट२०१६ रोजी कन्यागत महापर्वास प्रारंभ करण्यात आला. त्याची सांगता मंगळवारी १२ सप्टेंबर २०१७ रोजी कृष्णामाई नदीस साडी नेसवून तसेच १०१ कन्यापूजनाने झाली. यावेळी कन्यागत समितीच्यावतीने करण्यात आलेल्या धार्मिक विधीबरोबर नदी स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. समितीच्यावतीने नदीस साडी नेसवून तसेच महाआरती करण्यात आली.कन्यागत पर्व काळात तेरा महिने रोज नदीची आरती बारा वर्षातून एकदा आलेल्या कन्यागत पर्व काळात कºहाडच्या कृष्णा नदीकाठी १२ आॅगस्ट २०१६ रोजी महाआरतीने प्रारंभ करण्यात आला होता. त्यादिवसापासून आजपर्यंत तेरा महिने दररोज न चुकता सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नदीचे पूजन करून आरती करण्याचे सुरू होते. 

कन्यागत महोत्सव समितीचा कृष्णा नदीस साडी नेसविण्यामागचा मुख्य उद्देश हा नदीस मातृत्व मानत असल्याचा आहे. नदीप्रदूषण टाळण्यासाठी पूर्ण वर्षभर समितीच्या वतीने प्रयत्न केले गेले आहेत. निर्माल्य कुंडात तसेच मूर्ती या जलगुंडात विसर्जित करून नदीप्रदूषण टाळण्यास सहकार्य केले आहे.- डॉ. विनायक गरुड, अध्यक्ष, कन्यागत महोत्सव समिती, कºहाड