कºहाड 28 : रेठरे बुद्रूक, ता. कºहाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अंतीम ऊसदराची उत्सुकता गुरूवारी संपली. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २५० रूपयांचा अंतीम हप्ता अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला. यापुर्वी दिलेले २ हजार ९५० आणि गुरूवारी जाहिर करण्यात आलेले २५० असा एकुण ३ हजार २०० अंतीम ऊसदर मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकºयांची दिवाळी खºया अर्थाने गोड झाली आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवारी कारखान्याच्या प्रांगणात उत्साहात पार पडली. डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनी २५० रूपयांचा अंतीम हप्ता जाहिर केला. त्याला टाळ्यांच्या कडकडाटात सभासदांनी दाद दिली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील उपस्थित होते.
कृष्णा सहकारी साखर कारखाना हा राज्यातील एक प्रगती पथावर असणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नजीकच्या कारखान्यांशी येथे ऊसदराची स्पर्धा नेहमीच चालते. दोन वर्षापुर्वी झालेल्या सत्तांतरानंतर कृष्णेच्या चाव्या हाती घेतलेले डॉ. भोसले ऊसदराबाबत नेमका काय निर्णय घेणार, याबाबत शेतकºयांच्यात उलटसुलट चर्चा होती. मात्र, गुरूवारी जाहिर करण्यात आलेल्या दरामुळे या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णाचा ३ हजार २०० रूपये हा दर विनाकपात आहे. शिवाय ऊस घालणाºया सभासदांना आपण मोफत प्रतीमहिना पाच किलो साखर देतो. या सर्वाचा सारासार विचार करता कृष्णा ऊसदरात कुठेही मागे राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.