शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

आयटीतील तरुणांच्या हाती कुदळ अन फावडे

By admin | Published: June 27, 2017 3:49 PM

कऱ्हाड तालुक्यातील तरुणाचा पुढाकार : पुण्यातील व्हायब्रेट एच. आर. भटकंती गु्रपद्वारे जलसंधारणाची कामे

आॅनलाईन लोकमतउंब्रज (जि. सातारा), दि. २७ : लाखो रुपयांचे पँकेज, शनिवार, रविवार सुटी... या सुटीत फुल्ल टू धमाल करायची... हा विचार आयटीतील तरुणाई करताना दिसतात. पण यालाही काहीजण अपवाद ठरतात. साताऱ्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात आलेल्या तरुणांनी "व्हायब्रण्ट एच आर भटकंती" गु्रप स्थापन केला. ही तरुण विकेंडला ग्रामीण भागात जाऊन सामाजिक कार्य करत आहेत. जल है तो कल है, हा विचार तरुणाईच्या डोक्यात घोळू लागला आहे. हाच विचार आता तरुणाईला विकेंड एन्जॉय करण्यासाठी वरदान देऊन जात आहे. वॉटर कप स्पर्धेत उतरलेली तरुणाई जलसंधारणाची कामे करण्यासाठी एकवटली आहेत. ग्रामीण भागात ही चळवळ सुरू असतानाच ग्रामीण भागात जन्मलेली पण पुण्यातील बड्या कंपन्यांमध्ये काम करणारी तरुणाईही मागे राहिलेली नाही. कऱ्हाड तालुक्यातील वडोली-भिकेश्वर येथील शंकर साळुंखे या तरुणाने युवक, युवतींना एकत्र आणले. पुणे येथील स्थायिक झालेल्या युवक युवतींनी "व्हायब्रण्ट एच आर भटकंती" ग्रुप निर्माण केला. त्यांच्यात समाजसेवेचा विचार पेरून पुणे येथील घोरावडेश्वरच्या डोंगरावर त्यांनी जलसंधारणाचे काम सुरू केले. गेल्या वर्षी घोरावडेश्वरच्या डोंगरावर या ग्रुपतर्फे शेकडो झाडे लावली. खालून कँनच्या साह्याने पाणी नेऊन झाडे जगवली. भर उन्हाळ्यात पाण्याची कमी भासू लागली आणि घोरावडेश्वरच्या डोंगरावर पाणी उपलब्ध होण्यासाठी यंदा जलसंधारणाचे काम हाती घेतले. सुटीच्या दिवशी या युवक-युवतींनी घोरावडेश्वरच्या माथ्यावर तळ्यासारख्या भागाचे खोदकाम करून बांध उभारला. यामध्ये सुमारे दोन लाख लिटर पाणीसाठा अपेक्षित आहे. या पाण्याच्या फायदा खालील भागातील वनराईस व जलकुंडाना होणार आहे.काही महिन्यांपासून हे युवक सुटीच्या दिवशी सहकुटुंब डोंगरावर जातात. पाटी, खोरे घेऊन प्रत्येकजण कामाला सुरुवात करतो. बांध घालणे, चरी काढण्याचे काम करतात. त्याचवेळी काहीजण गाणे म्हणतात. विनोद सांगतात. हसत-खेळत, गप्पा मारत काम सुरूच राहते. ग्रुपमधील सर्वच सदस्य नामांकित कंपनीत एचआर या पदावर कायर्रत आहेत. पण येथे आल्यावर कोणीही कोणाला आदेश देत नाही. हे काम आपले समजून करतात. हा ग्रुप निर्माण होण्यापूर्वी हे सर्वजण व्हायब्रण्ट एच. आर. या संघटनेत कार्यरत होते. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर साळुंखे हे आहेत. या संघटनेत साडेतीन हजारांहून अधिक सदस्य आहेत. या ग्रुपच्या स्थापनेत अ‍ॅड. श्रीनिवास इनामती, संभाजी काकड, अ‍ॅड. आदित्य जोशी, अ‍ॅड. विजय जगताप, विकास पनवेलकर, सुनील बागल आदींचा सहभाग आहे.

 

दीड हजार विद्यार्थ्यांना मदत

"व्हायब्रण्ट . आर." हे या संस्थेशी दोन वर्षांत तब्बल ३,८०० सभासद झाले आहेत. सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण या विषयावर विविध उपक्रम संस्था राबवत असते. संस्थेतर्फे सदस्यांना कामगार व औद्योगिक कायद्यांची माहिती देण्यासाठी १२० बैठका झाल्या. कामगार व औद्योगिक कायद्यांवर तज्ञ मंडळींच्या उपस्थितीत २८ चर्चासत्रे घेतली आहेत. आठ शैक्षणिक संस्थांसोबत करार करून दीड हजार विद्यार्थ्यांना मदत केली आहे,ह्ण अशी माहिती संस्थापक अध्यक्ष शंकर साळुंखे यांनी लोकमतह्शी बोलताना दिली.

मोफत आरोग्य तपासणी

सामाजिक बांधिलकी जपत पुणे जिल्ह्यातील साकुर्डी गाव दत्तक घेऊन सलग दोन वर्षे गावकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप शिबीरे घेण्यात आली. पाबळ येथील आश्रमास मोफत आवश्यक वस्तूं दिल्या. अशी केली कामे

पाचशेहून अधिक झाडांची लावगड सायकल चालवा पर्यावरण वाचवा या रॅली किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव आयोजनामध्ये सक्रिय सलग दोन वर्षे रायगड, लोहगड, घोरावडेश्वर गडावर स्वच्छता, प्लास्टिकमुक्तीची मोहीम १५ आॅगस्ट व २६ जानेवारीला शांतता रॅली काही मोजक्याच लोकांनी सुरू केलेले हे श्रमदान चळवळीत रूपांतरित होतेय. शेकडो युवक युवती यात सामील होत आहेत. यातून आम्ही डोंगरावर पाणीसाठा करून परिसरातील झाडे जगवून, झाडे लावून परिसर हिरवागार एक दिवस करणार आहोत.- नवनाथ सूर्यवंशी मूळ गाव खटाव जि. सातारा.एकाने दोन तास काम केले आणि शंभर जणांनी मिळून दोन तास काम केले तर मोठे काम उभारते. आम्ही सर्वजण एकीच्या बळावर जलसंधारणाचे काम करत आहोत. माज्या मुलाला बरोबर घेऊन जाते. यामुळे मुलांनाही श्रमदानाची आवड निर्माण होते. - रीमा दौण्डेमूळ गाव करमाळा जि सोलापूर.कुटूंबातील सदस्य, मित्रांनाही यात सामील करुन घेतले. या ग्रुपमधे आल्यापासून जीवनात नवचैतन्य आले आहे. यापुढे ही बांधिलकी अशीच मी जपणार आहे.- दीपक खोत.मूळ रा. कोल्हापूर.