शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ढेकळांच्या रानात फिरू लागली बैलं!

By admin | Published: May 24, 2015 9:52 PM

शेतकरी शिवारात : पेरणीपूर्व मशागतींना वेग; नांगरट, कुळवणीसाठी लगबग

कऱ्हाड : रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे आणि कारखान्यांचा गळित हंगामही अंतिम टप्प्यात असल्याने सध्या शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतातील पालापाचोळा गोळा करण्यासह नांगरटीच्या कामांनी गती घेतली आहे. काही ठिकाणी हळद लावणीसह प्रारंभ झाला आहे. गत खरीप हंगामाच्या अगदी काढणीपासून अवकाळीला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या भात, भुईमूग, सोयाबीन, मका, हायब्रीड आदी पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करायला किंवा नुकसान भरपाई द्यायला प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. त्यानंतर रब्बी हंगामाची सुद्धा पेरणीपासून काढणी घेऊन आजअखेर पावसाने काही बळीराजाचा पाठ सोडलेला नाही. रब्बी हंगामाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शाळू, गहू, हरभरा आदी पिकांचेही या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे खरीप हंगाम काढणीवेळी गारपीट आणि रब्बीच्या काढणीवेळी अवकाळी हात धुवून बळीराजाच्या मागे लागल्याने तो पुरता खचला आहे. आता आगामी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीही सततच्या पावसामुळे करता येईनात, अशी परिस्थिती आहे. सध्या या मशागती बरोबरच रानात शेण खत टाकणे, बांध घालणे आदी कामे जोमात आहेत. डोंगरी परिसरात साधारण मे च्या मध्यापासूनच खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ होऊन धूळवाफेवर म्हणजेच कोरड्या मातीत खरिपाच्या पेरण्या होतात.सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, करडई, मका या पिकांची काढणी पूर्ण झाली असून, शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी मशागतीची नांगरट करणे सोपे झाले आहे. बैलांनाही त्याचा होणारा त्रास यावर्षी वाचला आहे. नांगरट पूर्ण होत आली असून, कुळवाच्या पाळ्या देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)पाटणला भाताची तयारी...पाटण तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी मान्सूनची हजेरी वेळेवर होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी भातासाठी वाफे तयार करण्यात व्यस्त आहेत. २५ मे पर्यंत काही शेतकरी पाणी पाजून भाताची पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. सोयाबीन, भुईमुगावर भरकऱ्हाड तालुक्यात उसाचे पीक बारमाही घेतले जाते. तसेच खरिपाच्या सुरुवातीला आडसाली उसाची लागणही तालुक्यात होते. उसाबरोबरच सोयाबीन, भात, घेवडा, उडीद, मूग, चवळी, भुईमूग, हायब्रीड आदी पिकांचे उत्पादन खरीप हंगामात घेतले जाते. बहुतांश शेतकरी खरिपात भुईमूग व सोयाबीनचे उत्पादन हमखास घेतात. चार महिन्यांचा असतो हंगामपावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी होणाऱ्या पिकांना खरीप पिके म्हणतात. हा खरीप हंगाम जून ते सप्टेंबर दरम्यान असतो. प्रमुख खरीप पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, कापूस, भूईमूग, मटकी, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांचा समावेश होतो.