शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Satara: कुसगाव ग्रामस्थांचे वाई पोलिसांविरोधात अर्धनग्न आंदोलन, नेमकं प्रकरण.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: July 18, 2024 7:30 PM

सातारा : कुसगाव, ता. वाई गावच्या हद्दीत असणाऱ्या एका क्रेशर मालकाच्या सांगण्यावरुन वाई पोलिसांनी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. विनाकारण ...

सातारा : कुसगाव, ता. वाई गावच्या हद्दीत असणाऱ्या एका क्रेशर मालकाच्या सांगण्यावरुन वाईपोलिसांनी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप करत कुसगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. तसेच यावेळी वाई पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कुसगाव या गावच्या हद्दीतील एका क्रेशर मालकाच्या सांगण्यावरून वाई पोलिसांनी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. ग्रामस्थांच्या विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली आहे. तसेच वाईचे पोलिस निरीक्षक, पोलिस उप अधीक्षकांसमवेत अनेक बैठकाही झाल्या होत्या. गुन्हा दाखल केल्या संदर्भाने अनेक चर्चा झाल्या. त्यावेळी गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात आले.परंतु २२ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी ठेवल्यानंतर क्रेशर मालकाच्या विरोधात निकाल जाईल या भीतीपोटी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा गुन्हा आधीच दाखल आहे असे सांगण्यात आले. सध्या अटक होणार अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. परंतु कायद्यातील तरतुदीप्रमाणे संबंधितांना गुन्हा दाखल झाल्यानंतर नोटीस देणे बंधनकारक होते.याप्रकरणात पोलिस संशयास्पद वृत्तीने दबाव आणत आहेत. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय आणि दाखल गुन्ह्याबाबत चौकशी व्हावी. पोलिसांकडून सुरू असलेला गैरप्रकार थांबविण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करीत आहोत. त्यातच ग्रामस्थांचा पोलिसांवर विश्वास नसल्याने क्रेशर प्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत परिसरात राज्य राखीव सुरक्षा दलाची सुरक्षा देण्यात यावी. तसेच याबाबत निकाल लागत नाही तोपर्यंत पोलिसांना यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. असा आदेश व्हावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाईPoliceपोलिसagitationआंदोलन