कऱ्हाड : येथील कृष्णा नाक्यापासून कृष्णा पुलापर्यंत कोठेही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिक, विक्रेते आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. या परिसरात स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी वारंवार पालिकेत करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गतिरोधकाची गरज (फोटो : २०इन्फोबॉक्स०१)
कऱ्हाड : कऱ्हाड- ढेबेवाडी रस्त्यावरील आगाशिवनगर परिसरात सतत रहदारी असते. त्यामुळे मार्गावर जिथे दुभाजक आहेत, त्याठिकाणी गतिरोधक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गतिरोधक नसल्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असतात. यावेळी नेहमी अपघात होत असतात.
सफाईचा फज्जा
कऱ्हाड : उपमार्गालगत असलेल्या नाल्यांच्या सफाईचा फज्जा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी पाण्याबरोबर वाहत आलेले कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे महामार्ग देखभाल विभागाने नेमके कोणते काम केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्याची दुरवस्था (फोटो : २०इन्फोबॉक्स०२)
मसूर : मसूर ते रेल्वेस्टेशन मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता खचला आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.