शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
2
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
3
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
4
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
5
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
6
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
7
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
8
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
9
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
10
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
11
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
12
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
13
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
14
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
15
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
16
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
17
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
18
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
19
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
20
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक

लेडीज बसची देशाला भुरळ

By admin | Published: September 22, 2016 11:24 PM

कन्या सुरक्षा अभियान : अनेक शहरांमध्ये मलकापूरची योजना राबविणार...

मलकापूर : तीन वर्षांपूवी मलकापूर नगरपंचायतीने राबविलेली ‘लेडीज स्पेशल बस’ची योजना आता देशभरातील अनेक शहरांमध्ये राबविली जाणार असून, यामुळे सातारा जिल्ह्याचे नाव उंचावले गेले आहे. मुलींचे शैक्षणिक करिअर उंचावणाऱ्या या योजनेचे कौतुकही होत आहे.‘केवळ पाणी, रस्ते अन् ड्रेनेज एवढीच आपली जबाबदारी नाही. आपल्या गावातील पोरीबाळींच्या सुरक्षेचीही जबाबदारी आपण उचलायला हवी,’ अशी स्पष्ट भूमिका मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी घेतली होती.त्यानंतर २०१३ मध्ये मलकापुरात राहणाऱ्या; परंतु कऱ्हाडात शिकण्यासाठी जाणाऱ्या कॉलेजकन्यांंना मोफत पास देण्याचा ठराव नगरपंचायतीनं मांडला. या पासचा निम्मा खर्च पंचायतीनं तर निम्मा एसटी महामंडळानं उचलला. अन् ७ जुलै रोजी श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानांतर्गत ‘ओन्ली गर्ल्स् बस’ प्रवासाला निघाली. एका स्थानिक स्वराज संस्थेनं सुरू केलेली देशातली पहिली ऐतिहासिक बस. ना तिकिटाच्या पैशाची चिंता ना पुरुषांच्या घोळक्यात चेंगरण्याचं झंझट. रोज सकाळी एक बस ठराविक स्टॉपवर येऊन उभारते. त्यात प्रवेश फक्त अन् फक्त मुलींनाच. आतमध्ये कंडक्टरही महिलाच. बस भरली की निघाली थेट कॉलेजला. कुठेही गोंधळ नाही की ढकलाढकली नाही. पुरुषी नजरा नाहीत की त्यांचा स्पर्शही नाही. त्यामुळे मुलींची मानसिक स्थिती अत्यंत कणखर बनल्याचे निष्पन्न झाले आहे.आंध्र प्रदेशातील राजमुंडरी महानगरपालिकेनंही सेम अश्शीच बससेवा सुरू केलीय. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णयावर विसंबून न राहता राज्य शासनानंच पुढाकार घेऊन सर्वत्र अशी योजना अंमलात आणणं अत्यंत गरजेचं बनलंय. (प्रतिनिधी)