खंडाळा : ‘भारताला परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची मशाल पेटवली. देशभक्तीची शपथ घेऊन लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा दृढनिश्चय केला. पुण्यातील गंजपेठेत तालीम सुरू करून क्रांतिकारक घडविण्याचे काम केले. त्यांनी रोवलेल्या स्वातंत्र्यक्रांतीच्या बीजामुळेच भारतीय स्वातंत्र्याची धगधगती मशाल अखंड तेवत राहिली,’ असे मत लहुजी शक्तीसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
शिवाजीनगर, ता. खंडाळा येथे स्वराज्य मित्रमंडळाने आयोजित केलेल्या लहुजी वस्ताद यांच्या पुण्यतिथी समारंभात ते बोलत होते.
शिवाजीनगर, ता. खंडाळा येथे स्वराज्य मित्रमंडळाने आयोजित केलेल्या लहुजी वस्ताद यांच्या पुण्यतिथी समारंभात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या शोभा जाधव, सरपंच हर्षवर्धन भोसले, उपसरपंच शोभा भोसले, खंडाळा कारखान्याचे संचालक धनाजी डेरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भोसले, सुजीत डेरे, राधिका सपकाळ, स्वाती भोसले, चंद्रकांत पवार, सलिता सपकाळ, ज्योती भोसले यासह प्रमुख उपस्थित होते.
बाळासाहेब जाधव म्हणाले, ‘भारतात क्रांतीची बीजे रोवण्याचे काम लहुजींनी केले. त्यांच्याच कार्याचा आदर्श घेऊन लोकांचे संघटन करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लहुजी शक्तीसेना काम करीत आहे. समाजातील सर्वच घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यासाठी तरुणांनी एकत्र येऊन संघटना बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ही प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात कायमस्वरूपी लावण्यासाठी भेट देण्यात आली. विशाल सपकाळ यांनी स्वागत केले. सुजीत डेरे यांनी आभार मानले.
फोटो आहे..
१८खंडाळा
शिवाजीनगर, ता. खंडाळा येथील स्वराज्य मित्रमंडळातर्फे लहुजी वस्ताद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.