मसूर ,9 : वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसाने कºहाड उत्तरेतील गावांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाºयामुळे शेकडो एकरातील खरीप पिकांसह ऊस भुईसपाट झाले आहेत. या पावसाने उत्पादन घटण्याची भीती शेतकºयांतून व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगामातील ज्वारी ऐन बहरात असून, ती काळी पडू लागली आहे. कडधान्य काढणीच्या काळातच पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने शेतकºयांची तारांबळ उडत आहे. सलग झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाºयाने आडसाली ऊस आडवा झाला आहे. त्यामुळे आता या उसाची वाढ खुंटणार आहे.
उसाच्या वजनातही घट होणार असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच या पावसाने कडधान्यांसह भुईमुगाच्या शेंगा कुजू लागल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वीही मसूर परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे शेतात पाणी साठल्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. नाल्यातून उलटून वाहतूकीच्या मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
मसूर परिसरात हजारो एकरातील उसासह खरीप हंगामातील इतर पिके व भाजीपाला व फळबागा जमीनदोस्त झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ओढ्याला पाणी आले होते.
परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे दिसून येत होते. काही ठिकाणी पावसाचे वाहणारे पाणी घरात घुसून संसारोपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.