सातारा : माणदेशी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला धावपटू ललिता बाबर हिची राज्य शासनाकडून उपजिल्हाधिकारी (वर्ग १) पदी निवड झाली आहे.माण तालुक्यातील मोही गावची रहिवासी असलेल्या ललिता बाबर हिने आॅलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. ती मुख्यत: ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतींमध्ये भाग घेते. ती या प्रकारातील भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहे.फिक्कीने आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ सालचे क्रीडा पुरस्कारप्रदान करताना बाबर यांना स्पोटर््स पर्सन आॅफ दि ईयर असे म्हटले होते. तिला अर्जुन पुरस्कारही मिळालाआहे.३३ जणांची नियुक्तीमहाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्रीडा विभागाला दिले. यानुसार ललिता बाबर यांना थेट नियुक्ती देण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आॅलिम्पिकपटू ललिता बाबर यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:25 PM
सातारा : माणदेशी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला धावपटू ललिता बाबर हिची राज्य शासनाकडून उपजिल्हाधिकारी (वर्ग १) पदी निवड झाली आहे.माण तालुक्यातील मोही गावची रहिवासी असलेल्या ललिता बाबर हिने आॅलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. ती मुख्यत: ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतींमध्ये भाग घेते. ती या प्रकारातील भारताची राष्ट्रीय विक्रमवीर ...
ठळक मुद्देक्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल बहुमान