शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

चोरीच्या ट्रकमधून कपडे लंपास

By admin | Published: January 26, 2015 12:42 AM

शामगावला ट्रक बेवारस आढळला : पुसेसावळीमधून झाली होती चोरी

शामगाव : चोरून आणलेल्या मालवाहतूक ट्रकमधील साडेनऊ लाखांचे कपडे लंपास करून चोरट्यांनी ट्रक शामगाव, ता. कऱ्हाड परिसरात बेवारस स्थितीत सोडून दिला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, संबंधित ट्रक पुसेसावळी येथून शनिवारी रात्री चोरीस गेला होता. औंध पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शामगाव येथील बबन पोळ व बापूराव पोळ हे रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये जात असताना शिंदेवस्ती शिवारात मालवाहतूक ट्रक (एमएच ११ एम ४१५४) बेवारस स्थितीत उभा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ट्रकनजीक जाऊन पाहिले असता, ट्रकमधील माल उतरविण्यात आल्याचे व त्यामुळे परिसरात कचरा विखुरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच ट्रकनजीक कोणीही नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी ट्रकवर लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित मोबाईल क्रमांक येळीव, ता. खटाव येथील धनाजी जगताप यांचा होता. पोळ यांनी शामगावमध्ये ट्रक बेवारस स्थितीत उभा असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित ट्रक माझाच असून, तो आज पहाटे घरासमोरून चोरीस गेल्याचे धनाजी जगताप यांनी त्यांना सांगितले. माहिती मिळाल्यानंतर धनाजी जगताप यांच्यासह औंध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय देसाई, अशोक वाघमारे, कृष्णा सरडे यांच्यासह पथक शामगावमध्ये पोहोचले.पथकाने ट्रकची पाहणी केली असता, ट्रकमधील साडेनऊ लाखांची कपडे चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)