पुसेसावळी : येथील महाराष्ट्र शासनाच्या नगर भूमापन कार्यालयाला कोणी जागा देता का जागा? अशी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे. सदरचे कार्यालय हे सुस्थितीत व सुरक्षित नाही. अधिकाऱ्यांच्या शासकीय कामानिमित्त काही काळ हे कार्यालय बंद असेल तर नागरिकांची अवस्था मात्र ‘शिंगरु मेलं हेलपाट्यानं’ अशी होते. तरीही धोकादायक अवस्थेत हे कार्यालय कित्येक वर्षे येथे सुरु आहे.या कार्यालयात येणारे नागरिक मात्र जीव धोक्यात घालून कार्यालयापर्यंत येतात अन बंद कार्यालय पाहून निघून जातात. सदरचे कार्यालय हे पुसेसावळी, राजाचे कुर्ले, चोराडे, जयरामस्वामींचे वडगाव, औंध या गावांसाठी आहे. बुधवारी येथे आठवडा बाजार असतो. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी हे कार्यालय फक्त बुधवारीच सुरु असते. मात्र, याच दिवशी मोजणी अथवा अन्य शासकीय कामासाठी अधिकारी बाहेर गेले तर नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. येथील अधिकारी महिला आहेत. त्यांच्यादृष्टीने व कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्यादृष्टीने सदरचे कार्यालय सुरक्षित नाही. या कार्यालयास दुसरीकडे जागा उपलब्ध करावी, अशी मागणी या सजातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)अनर्थ घडू शकतोहे कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे. कार्यालयाकडे जाण्यास लोखंडी जीना आहे. वयस्कर लोकांना या जीन्यावरुन कसरत करत वर जावे लागते. कार्यालयाच्या चारही बाजूंना मोकळी जागा आहे. मात्र, या स्लॅबला संरक्षण नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी अनर्थ घटना घडू शकते अशी अवस्था या कार्यालयाची आहे.
पुसेसावळीतील भूमापन कार्यालयच भूमिहीन
By admin | Published: March 26, 2017 12:08 AM