शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

किल्ले प्रतापगड-कुंभरोशीजवळ घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 6:56 PM

अफझल खानाच्या कबरीजवळ असणाऱ्या वळणावर दरड कोसळली

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून, बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ९२०.४० मिलिमीटर म्हणजेच ३६ इंच पावसाची नोंद झाली, तर २४ तासांत २१३ मिलिमीटर (८ इंच) पावसाची नोंद करण्यात आली. पावसाची संततधार सुरूच असल्याने प्रतापगडावर जाणाऱ्या रस्त्यावर अफझल खानाच्या कबरीजवळ असणाऱ्या वळणावर दरड कोसळली. दरम्यान, बांधकाम विभागाच्या वतीने एका तासात दरड व माती बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली.महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. बुधवारी सकाळी कुंभरोशी ते किल्ले प्रतापगड या मार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखवत रस्त्यावरील दरड हटवून या भागातील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेचा अंबनेळी घाटातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.कुंभरोशी ते किल्ले प्रतापगड या रस्त्यावर बुधवारी सकाळी मोठी दरड कोसळली, ही दरड इतकी मोठी होती की, या दरडीबरोबर डोंगर उतारावर असलेले मोठमोठे वृक्ष रस्त्यावर येऊन उभे राहिले. यामुळे कुंभरोशी ते किल्ले प्रतापगड चार किलोमीटर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनांना दोन्ही बाजूला थांबावे लागले.

नदी, नाले, ओढ्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढअंबेनळी घाटातील दरड कोसळण्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये २४ तासांत २१३ मिलिमीटर म्हणजेच तब्बल आठ इंच पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओढ्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू केली. दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांचा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, वाहतूक पूर्ववत झाली तरी दरड काढण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. -महेश गोंजारी, उपविभागीय अभियंता, महाबळेश्वर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान