शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

कोयनेतील दुर्गम किल्ले मोजताहेत अखेरची घटका!

By admin | Published: August 04, 2015 11:23 PM

प्रशासनाचे दुर्लक्ष : जागतिक वारसा जपतोय; पण ऐतिहासिक वारसा हरवतोय

धीरज कदम - कोयनानगर -अतिशय दुर्गम, डोंगराळ अशा कोयना परिसरातील पर्यटनस्थळांची परवड अद्यापही थांबलेली नाही. एकेकाळी शिवाजी महाराज व त्यांच्या सवंगड्यांनी काही काळ वास्तव केलेल्या येथील भैरवगड, प्रचितगड, जंगली, जयगड या किल्ल्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागतिक वारसा हक्काच्या यादीत कोयना धरणाचा समावेश झाल्याचा आनंद सर्वांनाच आहे, पण ऐतिहासीक वारसा हरवतोय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.येथील जंगली जयगड येथे जाण्यासाठी फक्त चौथ्या टप्प्यापर्यंत रस्ता आहे. तेथून पुढे फक्त पायवाट आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी येथे रस्ता व्हावा, अशी मागणी करुनही येथील वनविभाग प्रत्येक वेळी याकामी आडमुठी भूमिका घेत आहे. पर्यटन विभागानेही या ठिकाणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे इतकी पडझड झाली आहे की, याठिकाणी शिवछत्रपतींच्या पद्स्पर्शाने पावन झालेला किल्ला होता असे जर एखाद्या नवख्या व्यक्तीला सांगितले तर विश्वासच बसणार नाही.हेळवाकच्या दक्षिणेस भैरवनगड नावाचा आणखी एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचीही मोठी पडझड झाली आहे. येथे जाण्यासाठी हेळवाकपासून पातारपुंज गावापर्यंत रस्ता आहे. तेथून पुढे सर्व अंतर पायवाटेने जावे लागते. येथेही रस्ता व्हावा म्हणून येथील काही जमीनमालकांनी आपल्या जमिनी देण्याचीही तयारी दर्शविली आहे. मात्र, तरीही येथील वनविभाग परवानगी देत नसल्यामुळे येथे रस्ता झालेला नाही. येथील भैरवनाथ मंदिरात गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी जत्रा असते. तेथे सर्व भाविकांना चालत जावे लागते. हा परिसर घनदाट जंगल आणि दऱ्या-खोऱ्यांचा आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणत्याही सुविधा नाहीत. येथून जर एखाद्याचा पाय घसरला तर तो किमान दोन हजार फूट खोल दरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.प्रचितगड हा देखील पर्यटकांच्या दृष्टीने धोकादायक असाच आहे. येथे जाण्यासाठी हेळवाक ते तळोशीपर्यंत तीन किलोमीटर डांबरी रस्ता आहे. तेथून पुढे १५ ते १६ किलोमीटर पायवाटेने चालत जावे लागते. हा किल्ला डोंगर उतरावर असल्याने येथे सातारा जिल्ह्याच्या बाजूने जाताना तिव्र उतार आणि रत्नागिरीकडून येताना चढ चढून यावे लागते. येथे असणारी पायवाटही धोकादायक आहे. येथील सातगाव कमिटीने किल्ल्यांची दुरुस्ती व्हावी, म्हणून वेळोवेळी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडे निवेदने दिली आहेत. मात्र, अजून एकही मागणी मान्य झालेली नाही. पर्यटन विभागाने लवकरात लवकर या ठिकाणाची दुरुस्ती करुन आपला ऐतिहासिक वारसा समृद्ध करावा, अशी मागणी होत आहे. भैरवगडावर अनेक ऐतिहासीक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची पडझड झाल्याने अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जबाबदार वनविभागच असून त्याच्या भूमिकेमुळे स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. - ईश्वरी जोशीपर्यटक, चिपळूण