शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
2
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
3
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
4
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
5
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
6
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
7
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
8
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
9
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
11
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
12
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
13
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
14
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
15
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
16
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
17
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
18
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
19
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
20
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप, नायब सुभेदार शंकर उकलीकर यांना मानवंदना देण्यासाठी नागरिकांची गर्दी

By संजय पाटील | Published: October 13, 2023 2:37 PM

कारगीलच्या लेह येथील बर्फाळ प्रदेशात सेवा बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत आले वीरमरण

कऱ्हाड/तांबवे : वीर जवान तुझे सलाम, शहीद जवान अमर रहे अशा घोषणा देत भारतमातेचे हुतात्मा सुपुत्र नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) यांना कऱ्हाडकरांनी अखेरचा निरोप दिला. शहीद जवान शंकर उकलीकर यांना मानवंदना देण्यासाठी तसेच त्यांच्या पार्थीवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अबालवृद्धांसह नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या. कऱ्हाडपासून वसंतगडपर्यंत सुमारे दहा किलोमीटर पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यामध्ये हजारो नागरीक सहभागी झाले होते.वसंतगड येथील शंकर उकलीकर हे भारतीय सैन्यदलात इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार या पदावर देशसेवेत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसंतगड येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कुलमध्ये झाले. कऱ्हाडच्या गाडगे महाराज महाविद्यालयातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. २००१ साली ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी बावीस वर्ष सेवा बजावली.त्यादरम्यान २००८ साली त्यांनी पुर्ण बर्फाच्छादीत शिखरावर चढण्याचा माऊंटींग कोर्स पुर्ण केला होता. त्यामध्ये त्यांना अ श्रेणी प्राप्त झाली होती. मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनीयरींग ग्रुपमधील १२२ इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कारगीलच्या लेह येथील बर्फाळ प्रदेशात सेवा बजावत होते. मात्र, त्याचठिकाणी झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले.शुक्रवारी त्यांचे पार्थीव सैन्यदलाच्या वाहनातून कऱ्हाडात आणण्यात आले. कऱ्हाडातील विजय दिवस चौकात त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांचे पार्थिव मुळ गावी वसंतगडला नेण्यात आले. या अंत्ययात्रेत हजारो नागरीक सहभागी झाले होते. दुपारनंतर वसंतगडाच्या पायथ्याशी पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड