शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

शेवटच्या षटकांत फटकेबाजी

By admin | Published: December 18, 2014 10:15 PM

अनेकांची दिवाळी कडू--खासदार अनू आगा यांनी सातारा तालुक्यातील शिवथर हे गाव दत्तक घेतले आहे.

जगदीश कोष्टी- सातारा  लोकसभा, विधानसभा निवडणुका याच वर्षी झाल्या. त्यामुळे सुमारे नव्वद दिवसांची आचारसंहिता यावर्षी लागल्याने विकासकामे करताना जिल्हा परिषदेसमोर तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, ‘संसद ग्राम’ योजनेअंतर्गत तब्बल तीन खासदारांनी जिल्ह्यातील गावे दत्तक घेतल्याने शेवटच्या काही षटकांमध्ये विकासकामांची फटकेबाजी करण्याची वेळ सातारा जिल्हा परिषदेवर आली आहे.‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. सातारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)पदी टी. आर. गारळे असताना निर्मल ग्राम योजनेत राज्यात डंका पिटवला होता. राज्यातील अनेक गावांनी या योजनेत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन नव-नवे उपक्रम राबवित राज्यात बक्षिसे मिळविली होती. त्याकाळी जिल्हा परिषदेने स्थापन केलेले ‘गुड मॉर्निंग’ पथक गावात गेल्याबरोबर अनेकांची पळापळ होत होती. या पथकाची अनेकांनी धास्तीच घेतली होती. गेल्या काही वर्षांपासून मात्र या योजनेला खीळ बसल्याचे जाणवत होते. त्यानंतर केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील वीस टक्के गावांमध्ये अध्यापही स्वच्छतागृहे नसल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला एक-एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अधिकारीही कामाला लागले आहेत. याच वर्षभरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडी झाल्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवरून बरेच मानापमान तसेच राजकीय खेळी झाल्याचे सातारकरांना पाहायला मिळाले. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तसेच आपल्याला सहकार्य करणारा जिल्हा परिषद गटांच्या बाबतीत बेरीज-वजाबाकीची गणितं करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवडी पार पाडल्या. त्यातूनच माणिकराव सोनवलकर यांच्या गळ्यात अध्यक्ष तर रवींद्र साळुंखे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली.सातारा जिल्हा परिषदेने या वर्षभरात अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने सर्वत्र बोलबाला होता आहे. ‘निर्मल ग्राम’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नऊ कुटुंबे दत्तक घेतली आहेत.अनेकांची दिवाळी कडूजिल्हा परिषदेतील कामात सुसूत्रता यावी, प्रशासकीय अडचणी कमी व्हाव्यात म्हणून संगणकीकरण वाढले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आॅनलाईन खात्यात जमा होत आहेत. मात्र, आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर दिवाळी कडू साजरी करण्याची वेळ आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्य करत असलेल्या ९१ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांत एक रुपयाही मानधन मिळाले नाही. तसेच कुष्टरोग नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे पगार वेळेत झाले नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली होती.उदयनराजे भोसले हे सातारचे खासदार आहेत. त्यांनी संसद ग्राम योजनेअंतर्गत सातारा तालुक्यातील कोंडवे गाव दत्तक घेतले. त्यांच्याबरोबर खासदार शरद पवार यांनी खटाव तालुक्यातील ऐनकूळ तर खासदार अनू आगा यांनी सातारा तालुक्यातील शिवथर हे गाव दत्तक घेतले आहे.