सतर्कतेचे आवाहन : घरमालकांकडून पोलीस ठाण्यात यादी सादरलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अलीकडे नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने साताºयात तात्पुरते वास्तव्यास येणाºया नागरिकांची संख्या वाढत असून, जवळपास ६,७०० कुटुंबं भाड्याने राहत आहेत. घरमालकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार हा आकडा आहे.दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी भाड्याने राहत असलेल्या लोकांची सविस्तर माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन घरमालकांना केले होते. गेल्या तीन वर्षांपासून सातारा शहर आणि परिसरात भाड्याने राहणाºया कुटुंबांची माहिती पोलीस संकलित करत आहेत. भाड्याने घर घेऊन दहशतवादी कारवाया केल्याचे अनेकदा तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे घर भाड्याने देताना घरमालकांनी त्यांचे फोटो, ओळखपत्र घेणे बंधनकारक केले आहे. अशा प्रकारच्या कारवाया केल्यानंतर संबंधित भाडेकरू रातोरात पळून जातात. घरमालकांनी त्यांचा पत्ता आणि फोटो घेतला नाही तर त्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. त्यामुळे हा सारा खटाटोप पोलिसांना करावा लागत आहे.पालिका म्हणते १४ हजार भाडेकरूसातारा शहरात ३६ हजार ४०० मिळकती आहेत. अनेक ठिकाणी बांधकामे अद्याप सुरू आहेत. त्यामुळे मिळकतींचा आकडा ४० हजारांच्या घरात आहे. पालिकेकडून ज्यावेळी घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला, त्यामध्ये जवळपास १४ हजार मिळकतीमध्ये भाडेकरू राहत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस ठाण्यात अद्यापही अनेकांनी भाडेकरूंची माहिती दिली नाही. परिणामी पोलिसांना वारंवार माहिती देण्याचे आवाहन करावे लागत आहे. सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याकडे आत्तापर्यंत ६ हजार ७०० कुटुंबे भाड्याने राहत असल्याची नोंद झाली आहे.तीन वर्षांत सातजणांवर गुन्हेगेल्या तीन वर्षांत भाडेकरूंची माहिती न देण्याºया सात घरमालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सध्या ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. अद्यापही अनेकांकडून भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली गेली नाही. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.घरमालकांना भाडेकरूंची नोंदणी पोलीस ठाण्यात करणे बंधनकारक आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भाड्याने राहत असलेल्या लोकांची सविस्तर माहिती असावी यासाठी पोलिसांनी हे बंधन घातले आहे.
साताºयात ६७०० भाडेकरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:24 PM