सातारा : शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी शंभूमहादेवाच्या मंदिरात शिवपिंडीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. तसेच यावेळी भक्तांनी शंभूमहादेवाला चांगला पाऊस पडू दे, दुष्काळ हटू दे... असे साकडे घातले.साताऱ्यातील कोटेश्वर तसेच कुरणेश्वर, यवतेश्वर, पाटेश्वर मंदिरात सोमवारी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कोटेश्वर मंदिरात महिलांनी पिंडीची विधीवत पूजा केली.शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने पारंबेफाटा ते सांगवी मुरा दरम्यान निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मोळेश्वर येथील पांडवकालीन शिव-पार्वतीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी शाळांच्या सहली आल्या होत्या. उरूल, ता. पाटण येथील स्वयंभू शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. निसर्गाच्या कुशीत हे शिवालय आहे. शेवटचा सोमवार असल्याने याठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला. भाविकांनी दर्शन घेऊन पावसासाठी प्रार्थना केली. (प्रतिनिधी)घुमला ‘हर हर महादेव’चा गजरआज शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने सातारा जिल्ह्यात विविध महादेव मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. हर हर महादेव’चा गजर करत ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये शिवपिंडीचे पूजन करण्यात आले.वाईचा घाट गर्दीनं फुललाशेवटच्या श्रावणी सोमवारी वाई येथील गणपती घाटावर अनेक गावांतून पालख्या येतात. आज हा घाट भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता.
शेवटचा श्रावणी सोमवार पावसासाठी
By admin | Published: September 07, 2015 8:53 PM