ओगलेवाडी : अनेक राजकीय आणि सामाजिक सभा, समारंभाचे साक्षीदार असलेल्या आणि तालुक्यातील सर्वात पहिल्या ‘दिवंगत पी. डी. पाटील स्मृती सदन’ असे नामकरण झालेल्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हजारमाची ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच विद्या घबाडे आणि उपसरपंच प्रशांत यादव यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या वास्तूची रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले. या इमारतीचे रंगकाम झाल्याने नवी झळाळी प्राप्त झाली आहे. तिरंगा रंगात रंगवलेली इमारत गावाच्या वैभवात भर टाकत आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदार झाल्यावर याठिकाणी खासदार निधीची रक्कम उपलब्ध करून दिली होती. या निधीतून येथे सभागृह बांधण्यात आले. गावातील मुख्य चौकात हे सभागृह असल्याने गावातील सर्व राजकीय कार्यक्रमांचे येथेच आयोजन होत असते. पी. डी. पाटील यांच्या निधनानंतर या इमारतीचे नामकरण ‘दिवंगत पी. डी. पाटील स्मृती सदन’ असे करण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर आणि सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या. त्यानंतर उपसरपंच प्रशांत यादव यांनी या इमारतीचे रंगकाम करण्याचा निर्णय घेतला. सरपंच विद्या घबाडे व सर्व नूतन सदस्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आणि दिवंगत पी. डी. पाटील स्मृती सदनाला रंग दिला जाऊ लागला. समोरच्या खांबाला आकर्षक भारतीय राष्ट्रध्वजाच्या तीन रंगात सजवण्यात आल्याने आकर्षकता वाढली आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक सभा, समारंभांचे साक्षीदार असलेले आणि गावच्या मुख्य चौकाची शान असलेल्या या स्मृती सदनाचे काम केल्याने गावकरी आनंदले आहेत. याच पद्धतीने ग्रामपंचायत आणि इतर मालकीच्या मालमत्ता यांचेही रंगकाम सुरू आहे. या इमारतींनाही काही दिवसातच नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. (वा.प्र.)
फोटो आहे.
२३पी.डी. पाटील