पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, अनिता जमाले, बानूबी सय्यद, शकुंतला पवार, प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार, सहायक प्रकल्प अधिकारी प्रतिभा लोंढे, विभागाच्या पर्यवेक्षिका सुधा नाईक आदींची उपस्थिती होती.
मुलांचे आरोग्य जपण्यासाठी पोषण आहाराबरोबरच अंगणवाडीची स्वच्छता, आहारातील घटक या बाबीही महत्त्वाच्या असल्याचे नामदेव पाटील यांनी यावेळी सांगितले. सुप्रिया पोवार यांनी गर्भवती मातांना नऊ महिने पोषण आहार कसा द्यावा, किशोरवयीन मुलींचा आहार व आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. प्रतिभा लोंढे यांनी प्रत्येक ऋतूतील फळे त्या-त्या वेळी भरपूर खाल्ल्यास शरीराचे चांगले पोषण होते, असे सांगितले. सुधा नाईक यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी पाटील यांनी आभार मानले. यावेळी अंगणवाडीत पाककृती, घरचा दवाखाना, पोषण आहार याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.