कऱ्हाड : कालेटेक येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नाना पाटील यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषद सदस्य मंगलताई गलांडे यांच्या मागासवर्गीय फंडातून या काँक्रिटीकरण कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
कालेटेक येथील मागासवर्गीय वस्तीतील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्याबाबत ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद सदस्य मंगलताई गलांडे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. सदस्य गलांडे यांनी तातडीने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. वीस टक्के मागासवर्गीय फंडातून या रस्त्याचे काम होत आहे.
नाना पाटील म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कऱ्हाड दक्षिण विभागात विकासकामे सुरू आहेत. जिल्हा परिषद सदस्यांनीही गटातील विकासकामांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होत आहे. यावेळी सरपंच ॲड. पंडित हरदास, उपसरपंच अजित यादव, माजी उपसरपंच जयवंत यादव, राहुल यादव, संदीप साळुंखे, भाऊसाहेब यादव, माजी सरपंच बाळासाहेब जावीर, बाळासाहेब मोरे, प्रकाश मोरे, विजय जाधव, सचिन काकडे, सुनील कदम, शशिकांत यादव, तंटामुक्ती अध्यक्ष जयकर खुडे आदी मान्यवर उपस्थित होते. अजित यादव यांनी आभार मानले.