लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शिक्षणाचा दर्जा वाढला आणि आधुनिकतेचा काळ आला तरी विवाहितेचे छळ मात्र कमी झाले नाहीत. छोट्या मोठ्या गोष्ष्टीतून खटते उडत असतात. परंतु हा वाद इतका टोकाचा बनतो की, विवाहितेला घरातून बेदखल केले जाते. एवढेच नव्हे तर नातू झाला तरी सासरी छळ सुरूच असतात. विशेषत: हे प्रकार ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक घडत आहेत.
जिल्ह्यामध्ये गत दोन वर्षांपासून लाॅकडाऊन होता. त्यामुळे अशाप्रकारच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत. वर्षभरात जिल्ह्यामध्ये २८ महिलांनी तक्रार केली आहे. तर चार महिने लाॅकडाऊन शिथिल झाला. त्यावेळी तक्रारींचा ओघ वाढला होता. या काळात जाचहाटाच्या १९ तक्रारी दाखल झाल्या. तर काही तक्रारी सामोपचाराने मिटल्या.
एकविसाव्या शतकातही महिलांची पिळवणूक आणि छळ होत आहे, हे दुर्दैव आहे. अनेक महिला आमच्याकडे तक्रार करतात. पती दारू पिऊन मारहाण, शिवीगाळ करतो. अशावेळी आम्ही पतीला आमच्या कार्यालयात बोलावून सामोपचाराने यावर तोडगा काढतो. शक्यतो पुन्हा संसार फुलतील, यावर आमचा भर असता.
आशालता जाधव, सामाजिक कार्यकर्ती, पाटण
पती पत्नीमध्ये अनेकदा मोबाइलमुळे वाद होत आहेत. दोघेही एकमेकांवर शंका घेतात. त्यामुळे हे शंकेचे काहूर संसाराची राखरांगोळी करत असते. दोघांचे संसार पुन्हा जोडले जावे, यासाठी दोघांचे आणि त्यांच्या घरातल्यांचे समुपदेशन केले जाते. जेणेकरून दुभंगलेली मने पुन्हा जोडली जावीत. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सविता साळुंखे, सातारा.
पन्नासी ओलंडली तरी छळ सुरूच
nकाही ठिकाणी अद्यापही पन्नाशी ओलांडली तरी छळ सुरू आहेत.
nआर्थिक चणचण, किरकोळ कारणावरून मतभेद कारणीभूत
n वय झालंय म्हणून संसाराचा गाडा रेटत नेला जातो. जेव्हा अशा घटना पोलीस ठाण्यात येतात. तेव्हा पोलीसही अवाक होतात. त्यांची समजूत काढून त्यांचा पुन्हा संसार जोडला जातो.