सातारा : शहर व परिसरातील सहा महिलांनी केलेल्या अत्याचाराच्या आरोपातून उपराकार लक्ष्मण माने यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, २०१३ मध्ये उपराकार लक्ष्मण माने यांच्याविरोधात शहर व परिसरातील सहा महिलांनी अत्याचार झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या घटनेनंतर काही दिवस माने अज्ञातवासात होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर ते तब्बल तीन महिने कारागृहात होते. जामिनावर सुटका झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये पुन्हा ते सक्रिय झाले. दरम्यान, बुधवारी दुपारी या खटल्याचा निकाल न्यायालयाने जाहीर केला. माने यांच्यावर अत्याचार प्रकरणाचे सहा आरोप ठेवण्यात आले होते. या सहाही आरोपातून त्यांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. (प्रतिनिधी)
लक्ष्मण माने यांची अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता
By admin | Published: October 19, 2016 10:42 PM