लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘राजू शेट्टी काय किंवा सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी काँॅगे्रस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी अभियान आयोजित केली आहे. या अभियानासाठी साताºयात आलेल्या धोंडगे यांनी सरकारच्या धोरणावरही चौफेर टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शेतकरी संघटनेचे शंकर गोडसे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, श्रीनिवास शिंदे यांची उपस्थिती होती.‘भारत हा देश कृषीवर अवलंबून आहे. मात्र हेच क्षेत्र सध्या अडचणीत आहे. शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा डाव भाजप सरकारने आखला आहे. या सरकारने बाहेरच्या देशामध्ये जमीन भाड्याने घेऊन तिथला माल भारतात आणला जात आहे. मागणी नसतानाही मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आयात केली जात आहे. मात्र, शेतकºयांना हमीभाव देण्यास टाळाटाळ केली जाते.
आमचे दोन कार्यकर्ते शेतकºयांनी निवडून दिले. मात्र, त्यांनीच धंदेवाईक राजकारण सुरू केले. तुमचे भांडण दीड जिल्ह्यापुरते आहे. आख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही वेठीस का धरत आहात? शेतकरी धर्मसंकटात आहे. त्याला दिलासा देण्यासाठी त्यागाची भूमिका घ्या,’ असा सल्ला धोंडगे यांनी यावेळी दिला.‘देश आणि राज्याच्या सर्वोच्च स्थानी असणारे पंतप्रधान व मुख्यमंत्री हे दोघेही सपशेल खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात १ लाख टीएमसी पाणी जलयुक्तच्या माध्यमातून साठवले. त्यांना टीएमसी आणि क्युसेक यातील फरक तरी कळतो का? माधव भंडारी, जेटली, दानवे, धोत्रे ही मंडळी वारंवार शेतकरी विरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत. देशात फॉर्मर इन्कम सिक्युरिटी कायदा लागू करावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जातआहे.केंद्र सरकारने केनियासह इतर जिल्ह्यांत जमीन भाड्याने घेऊन पिके लावली आहेत. भविष्यात देशातील शेतकरी देशोधडीला लावून कार्पोरेट फार्मिंग आणण्याचा डाव स्पष्ट होत असल्याची टीकाही धोंडगे यांनी केली.मोदी फकीर...पर हम तो बालबच्चेवालेमोदी त्यांच्या भाषणात नेहमी मै फकीर...असं म्हणत असतात. मोदीजी हम तो बालबच्चेवाले है...अशी उपरोधिक टीका शंकर धोंडगे यांनी यावेळी केली.