शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

बिगडे काम सवाँरनेवाला नेता - आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:22 AM

राजू भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य, परळी गट अनेक अडचणींवर मात करत... परिस्थितीशी दोनहात करत कधीही हार न मानलेला ...

राजू भोसले,

माजी जिल्हा परिषद सदस्य, परळी गट

अनेक अडचणींवर मात करत... परिस्थितीशी दोनहात करत कधीही हार न मानलेला आणि बंद पडत असलेल्या कामांना आपल्या चांगुलपणाच्या शिदोरीवर विरोधी पक्षात राहून देखील सत्ताधारी पक्षाप्रमाणे कामे पूर्ण करून घेणारा नेता म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ओळख. कास धरणाचे बंद पडलेले काम असो, मेडिकल कॉलेजचे रेंगाळलेले काम असो किंवा अगदी हद्दवाढीचा प्रश्न असो; सर्व कामे धसास लावणाऱ्या आणि कोणालाही न दुखावता जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या कर्तबगार नेत्याचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने....

मित्रांच्या दुनियेतील जीवलग, गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले सातारा आणि जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. ते कोणत्याही पक्षात असोत, लोकांना त्यांची कधीच भ्रांत नसते. आपला माणूस आणि आपल्या माणसांसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांनी अनेकांना आपल्या जवळ खेचून आणले आणि आपलेसे केले. त्यामुळे केवळ मतदारसंघातच नाही, तर जिल्ह्यात आणि राज्याच्या पटलावरही आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

केवळ राजघराण्यात जन्माला आले म्हणून तेवढ्याच पुण्याईवर न थांबता, स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे काम शिवेंद्रराजेंनी केले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचे काम झाले पाहिजे, अशा आग्रहाने त्यांच्याशी बोलणारा आणि प्रत्येकाशी स्वतंत्र ओळख असलेला नेता मिळणे दुरापास्तच. आतापर्यंत शिवेंद्रराजेंनी स्वत:चा कधीच विचार केला नाही. लोकांची कामे कशी मार्गी लागतील, एवढेच उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात गेले तरी लोक कधीच त्यांच्यापासून लांब गेले नाहीत. त्यांनीही कधी लोकांना अंतर दिले नाही. प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणीमध्ये धावून जाण्याची त्यांची पद्धत आहे. प्रत्येकाच्या सुखात आणि दु:खामध्ये सर्वांनाच त्यांचा आधार वाटत आलेला आहे.

सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना जोडले आहे. नवीन उद्योग सुरू करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. एमआयडीसी अडचणीत असताना त्याला उभारी कशी मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. राहुल बजाज यांच्याशी वैयक्तिक भेटीगाठी घेऊन त्यांना साताऱ्यातील युनिट सुरू करण्याची कायम विनंती केली. त्याबरोबरच बंद पडणाऱ्या अनेक कंपन्या त्यांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून कशा सुरू करता येतील, यासाठी प्राधान्य दिले. त्यानिमित्ताने लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यांचे संसार उभे राहिले पाहिजेत, यासाठी कायम बाबा प्रयत्नशील राहिले.

हद्दवाढीचा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी सोडविलाच होता. पण, सरकार बदलले आणि त्याला इतरांनी वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. पण, बाबांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. कधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून, तर कधी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शहराच्या जवळचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. हद्दवाढ झाली, ती केवळ शिवेंद्रसिंहराजेंच्यामुळेच झाली. त्याबाबत इतर कोणीही कितीही दावा केला तरी, त्यांचे प्रयत्न आणि त्यासाठीचे सातत्य दुर्लक्षित करता येणार नाही. या हद्दवाढीचा आपल्याला किती फायदा होईल, हा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला देखील नाही. पण, सातारा शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे गरजेचे आहे, हेच ध्येय ठेवून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळेच ते कोणत्याही पक्षात असले तरी कार्यकर्त्यांना फरक पडत नाही.

कास धरणाचे काम पुन्हा सुरू झाले, ते शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नाने. धरणाच्या कामाला निधी कमी पडत असल्याने काम निम्म्यावर थांबविण्यात आले होते. लोकांची अलीकडे येणे आणि पलीकडे जाण्याचीही अडचण होऊ लागली होती. अशा परिस्थितीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत ठाण मांडले. वाढीव निधीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर कासला वाढीव निधी खेचून आणला. त्यामुळेच कासची पाणी क्षमता वाढविण्याचे काम पुन्हा सुरू झाले. याचे श्रेय कोणीही घेतले तरी, बाबाराजेंनी केलेले प्रयत्न कोणालाच दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे अशी बंद पडणारी आणि अडचणीत असलेली कामे त्यांनी मार्गी लावली.

मेडिकल कॉलेजचे काम तर अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. जमीन हस्तांतरणापासून अनेक अडचणी येत होत्या. बाबाराजेंना त्याचे श्रेय मिळू नये यासाठी अनेक नेते प्रयत्नशील होते. त्यांनी तसे उद्योग देखील केले आणि आपल्या नावावर मेडिकल कॉलेज आणल्याचे श्रेय मिळविण्यासाठी प्रयत्न केला. शिवेंद्रसिंहराजेंनी कोणताच गाजावाजा केला नाही. पण, अजित पवार यांच्याशी त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध याठिकाणी कामाला आले. उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा दौऱ्यावर आलेले असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी मेडिकल कॉलेज ताबडतोब सुरू करत असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता शासकीय निवासस्थानी जयंत पाटील आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत कृष्णा खोऱ्याकडून जमीन हस्तांतरणाचे काम झाले. ही राजकीय इच्छाशक्ती आणि काम करून घेण्याची बाबांची हातोटी सहज कोणालाच जमणार नाही. अखेर सध्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातच मेडिकल कॉलेज सुरू करायचे आणि इमारत बांधकामानंतर ते नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले.

एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते बाबाराजेंचा जीवलग मित्र अशी माझी झालेली ओळख ही देखील बाबाराजेंची कर्तृत्ववान कार्यशैली आणि आपलेपणाच्या भावनेमुळे झाली आहे. सतत त्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे लोक आणि कार्यकर्त्यांना जपण्याचे प्रयत्न सुरू असतात. सर्वांना एकत्र करून ती ताकद बाबांच्या मागे उभी करण्याचेच काम आम्ही अनेक वर्षे करत आहोत, यापुढेही करत राहू... त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांची साथ अशीच अखंड राहो, ही अपेक्षा......