अजय जाधव--उंब्रज ग्रामपंचयतीच्या निवडणुकीत रणांगण चांगलेच तापले असून, संपूर्ण गाव बॅनरने सजले असून ‘सोशल मीडियाच्या’ माध्यमातून प्रचारही जोरात सुरू आहे.उंब्रज ग्रामपंचायतीच्या निवडणूक ही १७ जागासाठी होत आहे. यासाठी रणांगणात ४८ उमेदवार आहेत. ४ पॅनेलसह अपक्ष उमेदवारांनी आपले बॅनर लावली आहेत. ग्रामदैवतासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो, राष्ट्रसंतापासून अब्दुलकलामांचे फोटो, यशवंतराव चव्हाणाच्या पासून पी.डी. पाटील यांचे फोटो बाळासाहेब ठाकरे पासून कऱ्हाडच्या ३ आमदाराचे फोटोविविध बॅनेरवर झळकत आहेत. या फोटोसह फक्त उमेदवारांचे फोटो चिन्हे छापण्यात आली आहेत.सोशल मिडीयावर व्हॉटस्अॅपवर असलेल्या पूर्वीच्या ग्रुपवर अनेक उमेदवार व कार्यकर्ते अजुनही एकत्रच आहेत. या ग्रुपवर कार्यकर्त्याकडून उमेदवारांचे फोटो, चिन्हे, व्हिडीओ, व्हाईस रेकॉर्डींगचा वापर होत आहे. परस्पर विरोधी उमेदवार कुटुंबीय एकत्र ग्रुपवर असले, तरी सवर्जण हे प्रकार एन्जॉय करताना दिसत आहेत. शक्यतो वाद विवाद सर्वच पॅनेल कार्यकर्त्यांकडून टाळले जात आहेत आणि हे उंब्रजचे वैशिष्ट्ये आहे.बॅनेरबाजी, सोशल मिडियासह उमेदवार व कार्यकर्त्यांनी थेट मतदाराच्या गाठीभेटी घेण्यावरही जोर धरला आहे. ज्या ठिकाणी मतदारांशी थेट ओळख नाही तेथे कार्यकर्त्यांचा मित्राचा वापर करून थेट संपर्क साधले जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवाराकडून सर्वच प्रयोग केले जातात. काही ठिकाणी जेवणावळीला सुरुवात झालीआहे. काही चेहरे सर्वच ठिकाणी जेवणावळीत सहभागी होत आहेत. अशांचे मतदान कोणाला या उमेदवारही संभ्रमात आहेत. काही ठिकाणी मतासाठी हा उमेदवार ऐवढी रक्कम देणार तो तेवढी देणार याची खुमासदार चर्चा सुरू आहे. या प्रकारामुळे निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. पडद्यामागील सूत्रधार अबाधित..सर्वच पॅनेलसह अपक्षाचे गावभर बॅनर लावली आहेत. परंतु या सर्वच बॅनेर गावपातळीवरील कोणत्याच नेत्यांचे फोटो नाहीत. अनेकजणांनी नेता नाराज होऊ नये म्हणून कोणाचेच फोटो छापले नाहीत. तर काहीजणांनी नुता गुलदस्त्यात ठेवून पडद्यामागील सूत्रधार अबाधीत ठेवले आहेत. अशी चर्चा ग्रामस्थांच्यात आहे.
चौकाचौकातील बॅनरवरून नेते गायब
By admin | Published: October 27, 2015 10:58 PM