शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

नेत्यांच्या दारी स्वर्ग... शहरात मात्र नरक !

By admin | Published: December 10, 2015 11:59 PM

पालिकेची यंत्रणा नगरसेवकांच्या घरापुरतीच : कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईच्या तरतुदीची आवश्यकता--कचरा ‘कोंडी’

सातारा : कचरा... प्रत्येकजण याची जबाबदारी पालिका किंवा अन्य यंत्रणेवर ढकलून रिकामा होतो. काही चाणाक्ष लोकप्रतिनिधी शासनाची यंत्रणा राबवून आपले अंगण स्वच्छ करून घेतात. पण ज्यांच्या घराशेजारी लोकप्रतिनिधी राहत नाहीत, त्यांच्या घरापुढे कचऱ्याचा नरक आहे!सातारा शहरात कचरा उचलण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वॉर्डनिहाय घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. घंटागाडी अवेळी येणं किंवा कमी वेळेसाठी थांबणे यामुळे अनेकदा चार दिवसांचा कचरा साठवून ठेवावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी शहरातील काही मोजक्या आणि वर्दळीच्या ठिकाणी पालिकेच्या वतीने कचरा कुंडी ठेवण्यात आली आहे.ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात शिकलेले आणि व्यवहारज्ञान असणारी माणसं राहतात, असा एक समज आहे. पण कचराकुंडीच्या वापरात हा समज सातारकरांनी धुळीस मिळविला आहे. कचराकुंडीपासून फुटभर अंतरावर विखुरलेला केर बरेच काही सांगून जातो. कुंडीत टाकायला आणलेला केर कुंडीबाहेर टाकून सातारकरांना काय मिळते माहीत नाही, पण साताऱ्यात पाहुणे म्हणून येणाऱ्या अनेकांनी या अस्वच्छतेकडे सातारकरांचे गबाळेपण म्हणून अंगुलीनिर्देश केला आहे.बहुतांश घंटागाडी भल्या पहाटेच येऊन जातात. त्यावेळी गृहिणी पाणी किंवा मुलांच्या शाळेच्या तयारीत असतात. त्यामुळे घंटागाडी कितीही वाजवत राहिली तरी गृहिणीला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. नोकरदार महिला स्वत:ची गाडी असेल तर आॅफिसला जाता-जाता हा केर कचरा कुंडीत टाकते. काहीवेळा पतीच्या मागे बसून नेम धरून कचरा कुंडीत टाकण्याऐवजी अन्यत्र पडतो. आपला कचरा आपणच कचरा कुंडीत टाकण्याची सवय प्रत्येकाने लावली तर शहरातील हे विद्रुपीकरण बंद होईल. सातारकरांनी आपल्या घरासारखीच शहराच्या स्वच्छतेची काळजी घेतली तर अनेक प्रश्न प्रबोधनाशिवायही मिटून जातील यात शंका नाही. (प्रतिनिधी)कुंडीत भरतंय वासराचं पोट..सातारकरांना अद्यापही कचरा कुंडीत कसा टाकायचा याचे प्रशिक्षण दिले गेले नसल्याचे पाहायला मिळते. कचरा कुंडी ऐवजी मोठ्या प्रमाणावर कचरा कुंडीच्या आजूबाजूला पसरलेला असतो. कित्येकदा काही अतिशहाणे गाडीवरूनच केराची पिशवी भिरकवतात आणि मग या घाणीत अधिक भर पडत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली.स्वच्छतेसाठी बॅनर लावूनही गाढवपणा !वारंवार सांगूनदेखील नेहमीच्याच सोयीने भरचौकात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना समज देण्यासाठी काही जणांंनी शक्कल लढवून गाढवाच्या फलकाचा वापर केला आहे. ‘होय मी गाढवच आहे. मी येथेच कचरा टाकणार’ असा मजकूर लिहिलेला फलक असूनही कचरा टाकणे याठिकाणी बंद झालेले नाही. त्यामुळे कचरा टाकणारे गाढवच ठरले आहेत, असे यातून स्पष्टपणे सूचित होत आहे. ‘घंटा’पेक्षा कुंडी बरी...स्वच्छ व सुंदर सातारा साकारण्यासाठी शहरातील कचरा निर्मूलन ही एक महत्त्वाची बाब आहे. यासाठी पालिकेने सतत कचरा उचलण्यासाठी अगदी कुंडीपासून घंटागाडीचा वापर करून विविध उपाययोजना केल्या आहेत. तरीदेखील सदरबझार येथील हिरवाईजवळ वर्षांनुवर्षांपासून जीर्ण झालेल्या कुंडीतच नागरिक कचरा टाकत आहेत. कुंडीपेक्षा कचरा अधिक असल्याने हा कचरा दिवसभर परिसरात विखुरलेला असतो. घंटागाडीची वेळ निश्चित नसल्याने घंटागाडीपेक्षा जीर्ण झालेल्या कुंडीचाच वापर नागरिकांना अधिक योग्य वाटतो.