शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

लर्निंग लायसन्स ऑफलाइन बरे; आरटीओत पुन्हा धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:24 AM

सातारा : कोणाकडे अँड्रॉइड मोबाइलच नाही तर कोणाकडे अँड्रॉइड मोबाइल असूनही तांत्रिक बाबी कळत नसल्याचे घरबसल्या परीक्षा देऊन लर्निंग ...

सातारा : कोणाकडे अँड्रॉइड मोबाइलच नाही तर कोणाकडे अँड्रॉइड मोबाइल असूनही तांत्रिक बाबी कळत नसल्याचे घरबसल्या परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढणे अवघड होऊन बसले आहे. लर्निंग लायसन्ससाठी ऑफलाइन प्रक्रिया सोपी वाटत असल्याने अनेक उमेदवार पुन्हा आरटीओ कार्यालयात गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षार्थीऐवजी अन्य उमेदवार अथवा एजंटमार्फतच परीक्षा दिली जात आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया औपचारिकता ठरेल, असे काहींचे म्हणणे आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला उमेदवार या प्रक्रियेतून विनासायास पुढे जाईल व अपघाताला बळी पडेल, असे आरटीओ कार्यालयात आलेल्या काही उमेदवारांनी सांगितले. शहराच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाइल चालतो. परंतु ग्रामीण भागात ते मोबाइल काय साधा मोबाइल चालत नाही. कधी रेंज नसते तर कधी मोबाइल चार्जिंग झालेला नसतो. शिवाय मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे लर्निंग लायसन्स अडकून बसून परीक्षा अर्धवटच राहते. नाइलाजाने आरटीओ कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे शासनाने ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा सुरू केली आहे. परंतु तांत्रिक बाबीमुळे अनेकांना आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

चौकट-

ऑनलाइनसाठी अडचणी काय?

कोरोनामुळे शासनाने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी घरबसल्या सुविधा दिली आहे. परंतु यात तांत्रिक बाबींचे अडथळे येत आहेत. काही ठिकाणी अँड्रॉइड चालतो तर काही ठिकाणी अँड्रॉइड मोबाइलला रेंज मिळत नाही. कधी तर लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा देते वेळेसच मोबाईल हँग होऊन बसतो तर कधी अचानक चार्जिंग संपते त्यातच मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक नसल्याने ओटीपी मिळत नाही. काहींना तर लर्निंगसाठी ऑनलाइन पद्धत समजत नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयात जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे.

चौकट-

दोनशे लायसन्स ऑनलाइन

जिल्ह्यात १४ जूनपासून ऑनलाइन लर्निंग लायसन्सची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत जवळपास दोनशे लायसन्स ऑनलाइन पद्धतीने पूर्ण झाली तर २२० लायसन्स ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांना दिली गेली आहेत.

चौकट-

उमेदवार वेगळा ऑनलाइन परीक्षा देणारा दुसराच

ऑनलाइन प्रकारामुळे तोतयेगिरी वाढली आहे. परीक्षा देणारा वेगळाच असतो आणि त्याला सांगणारा हा वेगळाच असतो. या अशा प्रकारामुळे पुढे चालून परीक्षार्थीला अपघातास सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. लर्निंगमध्ये पास झाल्याचा आनंद मिळत असला तरी परमनंट लायसन्स काढतेवेळेस प्रश्नांची उत्तरे देताना जवळ कोणी नसणार आहे. त्या वेळी पाचावर धारण तर बसणारच आहे शिवाय परमनंट लायसन्सही त्याला मिळणार नाही.

कोट-

शासनाने लागू केलेली लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन पद्धती चांगली आहे. परंतु ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाइल चालत नाही. मोबाइल अँड्रॉइड असूनही तांत्रिक बाबी समजायला काही मार्ग नाही. ऑनलाइन पद्धत काय असते, हे समजून घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात यावे लागले. ऑनलाइन पद्धतीसाठी मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. यापलीकडे कोणतीही विस्तृत माहिती सध्या माझ्याजवळ नाही.

रामनरेश भोसले

कोट-

लर्निंग लायसन्ससाठी शासनाने ऑनलाइन पद्धत सुरू केली आहे. ही पद्धत चांगली असली तरी तांत्रिक बाबी काही समजत नाहीत. परीक्षा देते वेळेस मोबाइल हँग होत आहे. ऑनलाइन समजत नाही म्हणून शेवटी आरटीओ कार्यालयातच मला जावे लागले. ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढण्याबाबत आरटीओ कार्यालयाने सर्वांना मार्गदर्शन करावे व ही समस्या दूर करावी.

- धीरज माने

कोट-

शासनाने ऑनलाइन सुरू केलेली लर्निंग लायसन्सची प्रक्रिया चांगली आहे. परंतु काही उमेदवारांना यात अडचणी येत आहेत. ऑनलाइनची माहिती नसेल तर आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून ती घ्यावी. लर्निंग अथवा परमनंट लायसन्ससह इतर कोणतीही अडचण आल्यास आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून माहिती घ्यावी.

- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

आयकार्ड फोटो आहे.