रामचंद्र पवार यांनी माथाडी कामगार म्हणून काम करताना ३० हजाराचा मासिक पगाराची नोकरी सोडून भात शेतीत रमत आहेत. त्यांच्या दोन मुली, पत्नी मिळून सतत भात शेतात राबत असतात. यांत्रिक पध्दतीचा कोणताही वापर न करता केवळ मेहनीवर त्यांनी भात शेतीचा हा मळा फुलविला आहे. सगळीकडे दुष्काळाची ओरड सुरू असताना काही शेतकरी मात्र त्यातूनही मार्ग काढत जिद्दीने शेती करताना पहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे कोकिसरे ता. पाटण येथील रामचंद्र ज्ञानदेव पवार यांच्या भारदस्त भातशेतीचे उदाहरण बरेच काही सांगून जाते. खरीप हंगामातील वेगळा संकरीत वाण वापरून रामचंद्र पवार यांनी फुलविलेला भात शेजीचा मळा दुष्काळातही विक्रमी भाताचे उत्पन्न घेणार हे निश्चित!मोरणा परिसरातील कोकिसरे गावचा दलदलीचा भात शिवार म्हणजे पाटण तालुक्यातील भाताचे कोठार समजले जाते. मात्र, यावर्षी हा परिसर पावसा अभावी वाया जातोय की काय? अशी भिती निर्माण झाली होती. मात्र याच गावातील जिद्दला पेटलेल्या रामचंद्र पवार या शेतकऱ्याने ३० हजार पगाराची नोकरी सोडून केवळ भात शेतीवर लक्ष केंद्रित केले. पवार कुटूंबियांची २५ एकरांत भातशेती आहे. हिरवीगार भातशेती सध्या पोटऱ्यात आली असून भाताचे तुरे बाहेर पडू लागले आहेत. भात शेतीला सतत पाणी द्यावे लागते, नाहीतर भाताचे पिक आणि लोंब्या करपतात. म्हणूनच रामचंद्र पवार ओढ्या वगळाचे पाणी खणून कुदळून भात शेतीला पुरवतात. सेंद्रिय खते व रासायनिक खते वापरून त्यांनी डोळ्यात भरण्याजोगी भातशेती फुलविली आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊन त्यांना अडीचशे पोती भाताचे उत्पन्न मिळणार आहे. नोकरीला रामराम करून शेतीत प्रयोग करणारे रामचंद्र पवार सध्या कोकिसरे व परिसरातील ग्रामस्थांसाठी कृषीदूत झाले आहेत. त्यांचे हे कष्ट पाहण्यासाठी लोक त्यांच्या शेतात हक्काने जातात.माझ्या गावांतील शिवार हा भातशेतीसाठी अनुकूल आहे. मात्र पावसाची ओढ आणि दुष्काळाचे चित्र दिसू लागल्यामुळे मी मुंबई येथील माथाडी मधील नोकरी सोडून गावाला आलो. आणि भात शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार केला. त्यामुळे मला माझी भातशेती इतरांपैक्षा डौलदार व विक्रमी उत्पादन देईल. भूईमुग, ज्वारी, सुर्यफूल आदी पिके सुध्दा मी खरीप हंगामात घेत आहे.- रामचंद्र पवार, कोकिसरे.
30 हजारांची नोकरी सोडून राबतोय शेतात
By admin | Published: September 21, 2015 9:05 PM