मेढा :शहरातील मुख्य बाजार चौकात रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सातारा-मेढा एसटी बसने मायलेकींना चिरडले. बसचे चाक डोक्यावरून गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर पोटच्या लेकीचा निष्प्राण देह घेऊन पिता सुन्न उभा होता.शालिनी रामू चव्हाण (वय २२) व अंजली रामू चव्हाण (३, दोघीही रा. गोपाळवस्ती, जवळवाडी मेढा) असे एसटीखाली चिरडून मृत पावलेल्या मायलेकीचे नाव आहे.याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान साताऱ्याकडून येणाºया सातारा-मेढा (एमएच ४० एन ९४३७) या बसमधून शालिनी चव्हाण व अंजली चव्हाण या मायलेकी मेढा येथे आल्या.या बसमधून इतर प्रवाशांबरोबरच शालिनी व अंजली चव्हाण या मायलेकीही उतरल्या. दोघी मायलेकी एसटीसमोरूनच रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एसटी बस मेढा डेपोकडे निघाली होती. त्या दोघी बससमोर असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले नाही. त्यामुळे बसचालक गाडी घेऊन निघाला. त्यावेळी त्या दोघींना बसची ठोकर बसल्याने त्या खाली पडल्या. त्यानंतर वाहकाच्या बाजूकडील चाक त्यांच्यावरून गेले. काहीक्षणात कळण्याआधी या दोघी मायलेकीच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, यावेळी मुख्य बाजार चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघातानंतर बसचालक दादासो जाधव पोलीसठाण्यात स्वत:हून हजर झाले. या अपघाताची मेढा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगरमेढा शहर परिसरात जवळवाडी येथे असणाºया गोपाळवस्तीमध्ये अनेक गरीब कुटुंबे मिळेल ते काम करून जीवन जगत असतात. चव्हाण यांचेही कुटुंब असेच असून, हातावर पोट असणाºया या कुटुंबावर अपघाताने मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्यावर्षीही या गोपाळवस्तीतील घरांवर एका खासगी व्यक्तीच्या मालकीची संरक्षक भिंत कोसळून काही लहान मुले व कुटुंबे ढिगाºयाखाली सापडली होती.
लेकीचा निष्प्राण देह घेऊन पिता झाला सुन्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 11:48 PM