नागठाणे : नागठाणे येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये सचेतना मंडळ व महिला तक्रार निवारण समितीच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिनाप्रसंगी ‘महिला सबलीकरण’ या विषयावर त्या होत होत्या.
यावेळी सुनीता कदम म्हणाल्या, ‘मुलींनी शिक्षित नाही, तर सुशिक्षित बनले पाहिजे. मुलींनी आपले आचार, विचार व संस्काराचा अंगीकार करून स्वत:ला आत्मनिर्भर बनवून अबला न रहाता सबला झाले पाहिजे. तसेच राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून स्वत:ला समृद्ध करणे गरजेचे आहे.’
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. आर. भोसले उपस्थित होते.
हा कार्यक्रम प्राचार्य तथा शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता (सामाजिक शास्त्रे विद्याशाखा) डॉ. जे. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. सचेतना मंडळ प्रमुख प्रा. जयमाला उथळे यांनी प्रास्तविक केले. प्रा. शौकत आतार व तनया माळी यांनी सूत्रसंचालन केले. श्रावणी जगताप हिने आभार मानले.