महाबळेश्वर : ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती महाबळेश्वर (शिक्षण विभाग) व ग्यान प्रकाश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक बालाजी जाधव सर यांचे ‘शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर काळाची गरज’ या विषयावर ऑनलाईन प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
शिक्षणात तंत्रज्ञानाचा वाढता वापर, शिक्षण पद्धतीचे बदलते स्वरूप, कोरोनासारख्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाचा प्रभावी वापर या गोष्टी शिक्षकांपर्यंत पोहोचाव्यात व शिक्षकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
केंद्रप्रमुख संभाजी भिलारे, प्रकाश भिलारे, दिलीप जाधव, दीपक चिकणे तसेच शिक्षक संघटना अध्यक्ष सुरेंद्र भिलारे, भाऊसाहेब दानवले, ग्यानप्रकाश फाउंडेशनचे अमर मस्के, डायटचे किरण शिंदे यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. सहायक केंद्रप्रमुख, मेंटाॅर टिचर्स आणि गटसाधन केंद्रातील साधनव्यक्ती, विशेष शिक्षक यांच्यासह भिलार केंद्रातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान दिले. विजय भोसले यांनी स्वागत केले, तर संजय पार्टे यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम माने यांनी सूत्रसंचालन केले. उमेश जाधव यांनी आभार मानले.