मसूर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, वैद्यकीय अधिकारी व व्यापारी यांच्यात संयुक्त बैठकीत झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला. मात्र, शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत सामाजिक अंतर ठेवून शेतमालाची विक्री करावी. बसस्थानक परिसर व इतरत्र कोठेही शेतमालाची विक्री करू नये. मसूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतर्गत येणारे सर्व व्यापारी, हॉटेल चालक, पिग्मी एजंट, दूध संकलन केंद्र चालक, बँका, पतसंस्था, विकास सेवा सोसायटीचे कामगार, चहाचे स्टॉलधारक, वडापाव विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, पानपट्टीधारक, केश कर्तनालयधारक, खत व पशुखाद्य विक्रेते, बी-बियाणे विक्रेते, बांधकाम साहित्य विक्रेते, वर्कशॉपधारक, उद्योजक, रसवंतीगृह चालक, सरबत व ज्यूस विक्रेते, मिठाई दुकानदार, चिकन व मटण विक्रेते, मासे विक्रेते, मिरची मसाले विक्रेते, गॅरेज व इतर सर्व प्रकारचे व्यवसायधारक व त्यांच्याकडील कामगार या सर्वांची कोरोना तपासणी मसूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत आहे. व्यापारी व विक्रेत्यांनी तातडीने आपली चाचणी करून घ्यावी. तपासणी न केल्यास व्यवसायाला परवानगी मिळणार नसल्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू असून लसीकरणाच्या नोंदणीसाठी ग्रामपंचायत कार्यालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.