शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

देवदरी घाटात बिबट्या आला रे...,वाहनधारकांकडून वावड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:51 PM

Leopard ForestDepartment Satara : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. मात्र वनविभागाने या वावडय़ांचे खंडन करून तो प्राणी तरस असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देदेवदरी घाटात बिबट्या आला रे...,वाहनधारकांकडून वावड्यातरस असल्याने न घाबरण्याचे वनविभागाकडून आवाहन

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. मात्र वनविभागाने या वावडय़ांचे खंडन करून तो प्राणी तरस असल्याचे म्हटले आहे.गेल्या दोन दिवसांपासून अंभेरी येथील देवदरी घाट परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. एका वाहनधारकाने गाडीतूनच रात्रीच्या सुमारास घाटातील रस्त्याच्या बाजूला उभा राहिलेल्या प्राण्याचा फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.

याबरोबरच फोटोमधील प्राणी हा बिबट्याच असल्याचा दावा संबंधित वाहनधारकाने केला आहे. फोटो दूर अंतरावरील आणि अंधारातील असल्यामुळे प्राण्यांची ओळख फोटोतून अचूकपणे होत नाही. परंतु सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सदर मेसेज व्हायरल झाल्यामुळे नागरिकांत कुतुहलाबरोबरच भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान याबाबत रहिमतपूर वनरक्षक नवनाथ कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ह्यया परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे स्पष्ट केले. तसेच यापूर्वीही देवदरी घाट परिसर, अपशिंगे व पवारवाडी या भागातील काही शेतकऱ्यांनी शेतातून ये जा करताना रात्रीचा बिबट्या दिसला असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.

मात्र त्यावेळी पाहणी केली असता तरसाच्या पायाचे ठसे दिसून आले होते. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर जो काही फोटो आणि माहिती पसरवली जात आहे. तो प्राणी बिबट्या नसून तरस आहे. शेतकरी व वाहनधारकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.ह्ण 

 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर