शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
2
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
3
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
4
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
5
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
6
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
7
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
8
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
9
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
10
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
11
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
12
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
13
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
15
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
16
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
17
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
18
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
19
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
20
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!

बिबट्याच्या बछड्यांचे आईशी घडले पुनर्मिलन, जखिणवाडीतील घटना

By संजय पाटील | Published: September 04, 2023 10:17 AM

जखिणवाडी येथील एका विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते.

कऱ्हाड : तालुक्यातील जखिणवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची वनविभागाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्या बछड्यांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन घडवून आणण्यातही वनविभागाला यश आले आहे. रविवारी मध्यरात्री मादी बिबट्या तिच्या दोन्ही बछड्यांना घेऊन शिवारात निघून गेली.

जखिणवाडी येथील एका विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. वन विभागाने दिवसभर अथक प्रयत्न करून दोन्ही बछड्यांना पिंजऱ्यात सुखरूप जेरबंद केले. त्यानंतर त्या बछड्यांना परिसरातच एका झाडाखाली ठेवण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाने त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅपही लावला होता. तसेच मादी बिबट्या त्याठिकाणी येऊन त्या बछड्यांना सोबत घेऊन जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. अखेर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास संबंधित बछड्यांचे त्यांच्या आईशी पुनर्मिलन घडवून आणण्यात वन विभागाला यश आले. 

मध्यरात्री त्याठिकाणी आलेल्या मादी बिबट्याने दोन्ही बछड्यांना आपल्यासोबत घेतले. त्यानंतर संबंधित मादी बछड्यांना घेऊन तेथून शिवारात पसार झाली. वनविभागाच्या प्रयत्नामुळे हे पुनर्मिलन घडून आले. वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये हा प्रसंग कैद झाला आहे.

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसर