शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सातारा: कोळे येथे भरवस्तीत घुसून बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला, दोन ठार

By प्रशांत कोळी | Published: October 13, 2022 5:11 PM

शेडच्या सभोवतालची पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथे भरवस्तीत घुसून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या जागीच ठार झाल्याने परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोळे येथील पाटील मळ्यात गणेश शंकर पाटील यांचे घर आहे. घराला लागून जनावरांचे शेड आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ते शेडमध्ये गेले असता दोन शेळ्या अर्ध खाल्लेल्या मृतावस्थेत पडलेल्या निदर्शनास आल्या. शेडला दरवाजा नसल्याने वन्य प्राण्यांकडून हल्ला झाला असावा, असा कयास झाला. त्यानंतर पाटील यांनी याबाबत कोळे वनविभागास माहिती दिली.माहिती मिळताच वनपाल बाबूराव कदम, वनरक्षक शंकर राठोड, वनसेवक अरुण शिबे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी शेडच्या सभोवतालची पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. ज्या पद्धतीने शेळीवर हल्ला केला होता ती पद्धत आणि पायाचे ठसे यावरून बिबट्यानेच हल्ल्या केल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्या