मलकापूर : जखीणवाडीत शेतकऱ्यांचा पाठलाग केलेली घटना ताजी असतानाच गेली तीन दिवस बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. बुधवारी कणसे मळा परिसरात हल्ला करून एक रेडकू ठार तर शुक्रवारी जुने इरिगेशन परिसरात हल्ला करून एक रेडी गंभीर जखमी केली आहे. जखिणवाडी (ता. कऱ्हाड) येथे गोठ्यात बांधलेल्या पाळीव जनावरांवर हल्ले होण्याचे प्रकार घडल्यमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखीणवाडी येथील कार्वेकर वस्ती नावाच्या शिवारात बिबट्याने आनंदा पाटील यांचा पाठलाग केल्याची घटना ताजी आसतानाच बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याच्या घटना सतत सुरूच आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार आगाशिव डोंगर पायथ्याला जखीणवाडी गावापासून काही अंतरावर कणसेमळा परिसरात आनंदा बाळू कणसे यांचे जनावरांचे शेड आहे. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या एका रेडकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. तर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जुने इरिगेशन नावाच्या शिवारात तानाजी ज्ञानू पाटील यांच्या वस्तीवरील जनावरांच्या शेडात बांधलेल्या रेडीवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे आसपासचे नागरिक जागे झाले. त्यांच्या गोंधळामुळे बिबट्याने रेडीला सोडून शेजारच्या उसात धूम ठोकली. या हल्ल्यात रेडीच्या नरड्याचा चावा घेतल्यामुळे गंभीर जखमी झाली आहे. त्या जखमी रेडीवर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबतची खबर कणसे व पाटील यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपाल ए. पी. सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात बिबट्याचा सततचा वावर असल्यामुळे आगाशिव डोंगर पायथ्याच्या गावात बिबट्याची दहशत कायम आहे.
(चौकट)
पाळीव प्राण्यांवर सतत हल्ले..!
जखीणवाडी गावाच्या पश्चिमेकडील शिवारात अनेकवेळा बिबट्याने शेळ्या ठार केल्या आहेत. गेली काही महिन्यांत येडगे यांच्याच शेतातील वस्तीवर पाच शेळ्या ठार केल्या होत्या. गेल्यावर्षीही मेंढपाळासमोरच दोन बिबट्यांनी हल्ला करत दोन मेंढ्यांसह श्वान ठार केले होते. त्यामुळे जखीणवाडीच्या पश्चिम भागात वर्षातून अनेकवेळा पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याचे समीकरणच झाले आहे.
चौकट
बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी..
बिबट्याचा नित्याचाच वावर झाल्याने शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी भीती वाटत आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाला निवेदने दिली आहेत.
१८मलकापूर बिबट्या
जखिणवाडी (ता. कऱ्हाड) येथील जुने इरिगेशन नावाच्या शिवारात तानाजी पाटील यांच्या जनावरांच्या शेडात बांधलेल्या रेडीवर हल्ला करत गंभीर जखमी केले. (छाया : माणिक डोंगरे)
180921\img_20210918_171344.jpg
फोटो कॕप्शन
जखिणवाडी ता. कराड येथील जुने इरिगेशन नावाच्या शिवारात तानाजी पाटील यांच्या जणावरांच्या शेडात बांधलेल्या रेडीवर हल्ला करत गंभीर जखमी केले. (छाया-माणिक डोंगरे)